महाविर जयंती निमित्त आधार गरजूंना उपक्रमातून डब्बे वाटप ; ११ वर्षात ३ लाख गरजूना डब्बे

नांदेड ; प्रतिनिधी

“आधार गरजूंना ” हा भाजपचा उपक्रम खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या पुढाकारातून आठ दिवसापासून सुरु असून नवव्या दिवशी महावीर जयंती व तारखेप्रमाणे बसवेश्वर जयंती निमित्त भाजपा जिल्हा सरचिटणीस धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या तर्फे एक हजार डबे शहरातील आठ रुग्णालय परिसरात वितरित करण्यात आले. अकरा वर्षात दिलीप ठाकूरांच्या मार्फत आत्तापर्यंत तीन लाखापेक्षा जास्त गरजूंना डबे वितरीत करण्यात आले.

भाजपच्या एका लोकप्रतिनिधी अथवा जेष्ठ पदाधिकारी तर्फे दररोज एक हजार डब्याचे योगदान देण्यात येते. आठव्या दिवशी सुरेश गुट्टे रवी कंस्ट्रक्शन मुखेड यांनी हजार डबे दिले. दररोज सात ठिकाणी डबे वितरित करण्यात येतात.रविवारी रुग्णांची संख्या कमी असल्यामुळे बरेच डबे शिल्लक राहिले. ते अण्णाभाऊ साठे परिसरातील रुग्णालयाजवळ भाजपा प्रसिद्धीप्रमुख धीरज स्वामी, दिव्यांग सेल जिल्हा संयोजक प्रशांत पळसकर,अरुणकुमार काबरा,
मंडळ सरचिटणीस कामाजी सरोदे , सुरेश शर्मा,संतोष ओझा,विजय ठाकूर यांनी वितरित करण्यासाठी परिश्रम घेतले.पहिल्यांदा २००२ मध्ये दिलीप ठाकूर यांनी रुग्णांसाठी डबे वाटपाची सुरुवात नांदेड मध्ये केली होती. भाऊचा डबा या उपक्रमात नऊ वर्षांत १,६४,००० डबे घराघरातून जमा करून गरजू रूग्णापर्यंत पोहचविले. पुढे शासकीय रुग्णालय विष्णुपुरी येथे स्थलांतरित झाल्यानंतर हा उपक्रम थांबला. १ जानेवारी २०१९ पासून दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून लॉयन्सचा डबा हा उपक्रम सुरू झाला. शंभर टक्के लोकसहभागातून वर्षातील ३६५ दिवस रयत रुग्णालयात दररोज तीस डबे तसेच श्री गुरुजी रुग्णालयात दररोज वीस डबे दिले जातात. गेल्या वर्षी सतत ५२ दिवस लॉकडाऊन मधील लॉयन्सचा डबा मार्फत ३२५०० गरजूंची भूक भागवण्यात यश मिळाले. गेल्या महिन्यातील दुसऱ्याला लॉकडाऊन मध्ये देखील पाच हजार डब्यांचे वितरण करण्यात आले. तिसऱ्या लॉकडाऊन मध्ये दररोज तीनशे डबे वितरित करण्यात येत आहेत. दिलीप ठाकूर यांनी लावलेल्या अन्नदानाचा रोपट्याला आता विशाल स्वरूप प्राप्त झाले आहे. रुग्णांसाठी अन्नदान ही एक चळवळ झाली आहे. अनेक स्वयंसेवी संस्था भाऊचा डबा या धरतीवर रुग्णसेवा करत आहेत. यामुळेच खासदार चिखलीकर व जिल्हाध्यक्ष प्रवीण साले यांनी दिलीप ठाकूर यांच्यावर आधार आधार गरजूंना या उपक्रमाची जबाबदारी टाकली.


भाऊचा डबा , लॉयन्सचा डबा,  अथवा आधार गरजूंना या उपक्रमाच्या अंतर्गत दिलीप ठाकूरांच्या मार्फत आत्तापर्यंत तीन लाखापेक्षा जास्त गरजूंना डबे वितरीत करण्यात आले आहेत. अखंडपणे अन्नदानाची सेवा करणाऱ्या दिलीप ठाकूर यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

(छाया: व्यंकटेश वाकोडीकर)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *