कंधार ; प्रतिनिधी
जगाला शांतीचा व समतेचा संदेश देणारे जैन धर्माचे तिर्थकार वर्धमान महाविर यांची जयंती कंधार येथिल 1008 श्री पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरात अत्यंत साध्या पद्धतीने कोरोनाचे नियम पाळून साजरी करण्यात आली असल्याची माहीती भारतीय जैन संघटनेचे तालुका अध्यक्ष राजहंस शहापुरे यांनी दिली.
दरवर्षी वर्धमान महाविर जयंती महोत्सवानिमित्य शहरातून समाज बांधवाच्या वतीने भव्य मिरवणूक काढण्यात येते तसेच विविध धार्मिक विधी करुन अभिवादन केले जाते.परंतु या गतवर्षी पासून कोरोना महामारीमुळे शासनाने ठरवून दिलेल्या नियमाचे पालन करुन आज दि.२५ एप्रिल रोजी
1008 श्री पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर कंधार येथील मंदिरात पुजारी तथा सह सचिव श्री प्रदिप महाजन , भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष राजहंस शहापुरे,उपाध्यक्ष अभयकुमार पहाडे,धनंजय मांगुळकर, सचिव सतिश बिडवई यांनी कोविड 19 चे नियम पाळुन अभिवादन करण्यात आले.तसेच समाज बांधवाच्या वतीने घरी सुरक्षित राहुन धार्मिक विधी व पुजन करुन महाविरास अभिवादन केले असल्याची माहीती भारतीय जैन संघटनेचे ता. अध्यक्ष राजहंस शहापुरे यांनी दिली.