योगसंदेश ;सुखी जीवनाचा पाया


आयुष्यातले ध्येय ठरवणे, सकारात्मक विचारधारा वाढीस लावणे, जनसंपर्क चांगला ठेवणे, कार्यरत राहणे या सगळ्या गोष्टी केव्हा जमतात ,जेव्हा आपले शरीर योग्य प्रकारे आपल्याला साथ देत असते तेव्हाच. उत्तम आरोग्य, निरोगी शरीर प्रकृती हा सुखी जीवनाचा पाया आहे.जेव्हा आपला एखादा अवयव दुखत असतो ,काही शारीरिक त्रास होत असतो तेव्हा मन कशातच लागत. चित्त थार्‍यावर नसले, की काही काम हातून होत नाही.कशाचाही उपयोग आपण आनंदाने देऊ शकत नाही. कुठला निर्णय व्यवस्थितरित्या घेऊ शकत नाही. माणसाचे आरोग्य ही बहुमोल गोष्ट आहे.कारण आरोग्यसंपन्न व्यक्तीच्या हातूनच काही चांगलं कार्य होऊ शकतं .आजारी माणसाच्या हातून काय काम होणार..?
उलट तोच दुसऱ्यावर ओझं झालेला असतो. जो निरोगी असतो तोच सुखी असतो.
[ शिर सलामत तो पगडी पचास ]
दोन दिवस आजारी पडून बघा. तुमची सगळी कामे तर खोळंबतीलच ,शिवाय पडून राहिल्याने कंटाळा येईल. सतत काम करणाऱ्या जिवाला झोपून राहणे बरे वाटत नाही. म्हणून मन कामात गुंतलेले असते आणि शरीर मात्र हलू शकत नाही. अशी विचित्र अवस्था होते.आजार कोणताही असला तरी त्याच्या खाण्यापिण्यात वागण्यात चूक झालेली असते हे नक्कीच .
कधीच आजारी पडायचे नसेल तर सातत्याने योगसाधन करा निरोगी राहा

निळकंठ बा.मोरे,

योगशिक्षक ,
पतंजली योग समिती कंधार
🙏🌹🧘‍♀️🧘‍♂️😷🇮🇳

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *