कोरोना काळातील अनुभव व गप्पा गोष्टी
दिनांक 17 एप्रिल रोजी मी कोरोना बाधित झालो. सिटी स्कोर 14 चा होता. स्कोर तसा कमी नव्हताच. ही माहिती डॉ. सचिन सरोदे याना दिली. लगेच भारती व्हा. सरांचा सल्ला आला. व्हिजन मध्ये लगेच भरती करून घेतल. डॉ. सचिन सरोदे , खर तर कोरोना रुग्नाना जिवानदान देणारा एक असा डॉक्टर की जो प्रत्येक वेळी रिस्क उचलतो. रुग्ण कितिही स्कोर चा असो. त्याला वाचविने आपले कर्तव्य आहे या भावनेने डॉ. सचिन सरोदे उपचार करतात. ही खोटी स्तुती नव्हे. अनुभव आहे. 23, 24 स्कोर असणारे रुग्न डॉ. सचिन सरोदे यानी दुरुस्त केलेत. उपचरासोबत रुग्णांचे मानसिक मनोबल वाढवत हजारो रुग्ण कोरोनमक्त केलेत.
” व्हिजन ” रुग्नाना जगण्याची नवी दृष्टी देणारे हॉस्पिटल. डॉ. सचिन सरोदे यांच्या सोबत काम करणारा तिथला प्रत्येक कर्मचारी प्रत्येक रुग्णाची प्रचंड काळजी घेतात. रुग्ण जनू स्वताच्या घरीच उपचार घेत आहेत असे वाटू लागते . त्यामुळेच तर व्हिजन मधून रुग्ण दुरुस्त होण्याचे प्रमाण जास्त आहे.
मी ही डॉ. सचिन सरोदे आणि व्हिजन मुळे 14 च्या स्कोर वर मात करून सुखरुप घरी परतलो. डॉ. सचिन सरोदे आणि व्हिजन चे मनापासून आभार.
याशिवाय आपण सर्व जण माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होतात. घाबरु नको. काहीही होत नाही हे पाठबळ खुप महत्वाचे होते. असंख्य मित्र , नतेवाइक कॉल करून चौकशी करत होते. हिम्मत देत होते. या बळावर मी कोरोनामधून बाहेर पडलो. आपले प्रेम.आपले पाठबळ. आपली हिम्मत अशीच कायम सोबत असावी. हीच अपेक्षा.
पुन्हश्च आपले सर्वांचे मनापासून आभार. मी पुन्हा लोकसेवेला तयार आहे…..
राम तरटे