क्रांतिनगरी बहाद्दरपुरचा प्रगतशील शेतकरी राजा सेवानिवृत्त अनुरेखक बालाजी गंगाराम पेठकर.


बहाद्दरपुरा ;प्रतिनिधी


कंधार हा नांदेड जिल्ह्यातील एक दुर्गम डोंगर-दर्यांत वसलेले तालूका मानला जातो.या तालुक्याला ऐतिहासिक ऐश्वर्य संपन्न वारसा असला तरी,ही क्रांतिनगरी राजकिय चळवळीमुळे अख्या देशात ओळखला जातो.शेतकरी कामगार पक्षाच्या पुरोगामी विचारांची जोडी म्हणजे डाॅ.भाई केशवराव धोंडगे व भाई गुरुनाथराव कुरुडे यांच्या राजकिय व शैक्षणिक कार्यामुळे आजवरचे कंधारचे राजकारण या नगरीच्या मातीत रुजलेले आहे.शैक्षणिक कार्यामुळे तर या तालुक्याला हिंम्मतबाज तालुका म्हणून नावारूपास आहे.नानाविध सत्याग्रह आणि शेतीत नवनविन प्रयोग करुन शासन दरबारात दबदबा निर्माण केला आहे.दक्षिण भारतातील सर्वात मोठ्या समजल्या जाणार्या माळेगावच्या यात्रेत येथील प्रगतशील शेतीनिष्ठ शेतकरी राजांनी अनेक बक्षीसे मिळवली.दत्त नगर माळीवाडा बहाद्दरपुरा या भाजीपाला पिकवणारा नंदनवनातील अनेक भाजी-पाला पिकविणार्यां अल्पभूधारक शेतकरी राजांनी तर रेकॉर्डब्रेक माळवे पिकवून जिल्ह्याभरात नाव कमविले.


१ नोव्हेंबर १९५६ रोजी मुंबई व्दिभाषीक राज्य निर्माण झाले.त्या व्दिभाषीक राज्यात ५८\५९ साली क्रांतिभुवन बहाद्दरपुरा नगरीतील प्रगतशील शेतकरी कृषिरत्न मा.राघोबाजी पा.पेठकर यांचा ऊस व्दिभाषीक राज्यात प्रथम आला.आमच्या नगरीच्या डोई मानाचा तुरा रोवला गेल्याने राघोबाजी पाटलांचा आमच्या सहित जिल्ह्यातील जनतेच्या मनाला आनंदाचे जणु उधाण आले.काल परवा त्यांच्या चुलत बंधु माजी उप सरपंच भाई पंडित विठ्ठलराव पा.पेठकर यांनी विक्रमी ६४ गुंठ्यात १२५ टन ऊस उत्पादक करुन गावाचे नाव जिल्ह्यात गाजवले.


आमच्या वडीलांचे परम मित्र, एक शेतीत नवनविन क्रांती करत उत्पादन काढणारे दिवंगत गंगाराम पा.पेठकर हे पिठाची गिरणीचा व्यवसाय करतांना इंधनाच्या गिरण्या उभारल्या कारण त्या काळात विद्युतची सोय नव्हती. त्यावेळी बहाद्दरपुरा येथे चावडीवर कंधार शहरात गवंडीपार येथे गिरण्या उभारल्याने अनेक परिवाराची सोय झाली.त्यांचे कडे भगवान महाराज व हुसेन साब हे गिरणी चालवत होते. त्यावर चरित्रार्थ चालवत.त्यांच्या गिरणी वरुन आमच्या परिवारातील दळण यांच्या गिरणीवरच,त्यावेळेस मला विचारत तू पापण्यांचा काय?गोपाळ गुरुजीचा का?असे प्रश्न अनेकजण विचारत.ता गिरणीच्या आवाजाने वाहनांचा आवाज लहान मुलांना ऐकू येत नसे.एकदा राजेश श्रीनिवास वंजे आमच्या या चौकात अपघात झाला.एस.टी.बसने या मित्रास जोरदार धडक दिली होती,त्या अपघातात त्यांचे दातच खुडले. शेतीची आवड असल्याने त्यांनी स्वतःच्या शेतात केळीचे भरघोस उत्पन्न काढतांना नवनविन शेती व्यवसायास एक प्रतिष्ठा मिळवून दिल्याने कंधार पंचक्रोशीत त्याची शेती व मशागत चर्चेचा विषय ठरत गेली.त्यांचे शेती राष्ट्रकुट कालिन भूईकोट किल्ल्याच्या नैऋत्य दिशेस असल्यामुळेच त्यांच्या विहिरीला मुबलक पाणीसाठा असायचा,ती विहीर सहा-सातमाही ओसंडून वाहत होती.मला ती शेती जवळून पाहता आली.ती अलिकडच्या कालखंडात ओहर फ्लो दिसत नाही.मन्याड नदीच्या किनारी रामटेकला अशा तीन-चार ठिकाणी
त्यांचा गुळ गाळण्याचा कारखाना होता.त्या नंतर गावातील शेजारी जान्याच्या आळी समोरच्या कोपर्‍यात त्यांतरचा राष्ट्रकुट भुईकोट किल्ल्यां जवळ सखाराम तात्या गजेवार यांच्या भागीदारीने गुळ कारखाना आरंभला होता.तसेच पुर्वी जलतुंग सागराचा उजवा कालवा हाजी सय्याह सरवरे मगदुम साहेबांच्या दर्गा खालुन तो कालवा पार द्वादशभुजा देवी मंदिरा पर्यंत येत असत.त्यावर बरीच बहाद्दरपुराची जमीन भिजत असे.पण एखादे वेळी त्या कालवा मार्गात कांही अडथळा आल्यास गंगाराम पा. पेठकर स्वतः आत जावून पानबुड्या सारखे पाण्यात बुडून लाकडाचे कट्टे व्यवस्थित करत यात ते निष्णात होते.

दर्गा खालील प्रवाहात कांही अडकल्यास प्रवाहाच्या उलटे जावून पाण्याचा प्रवाह सुरळीत करत असत.जुन्या नगर पालिके पुढील या कालव्याचे पाणी तीनही बाजुस व्यवस्थित जाण्याची व्यवस्था होती.या प्रगतशील शेतकरी राजांचे
ज्येष्ठ चिरंजीव सामाजिक क्षेत्रात धडपड करण्याची मनी जिद्द असलेले एक प्रगतशील शेतकरी ज्यांनी ट्रेसर पदाची नोकरी सांभाळून काल परवा ते सेवानिवृत्त झाले.


त्यांनी त्याच्या सेवा काळात ट्रेसर संघटना जिल्हा नांदेडचे अध्यक्षपद भुषविले.त्यांनी त्या संघनेत लढावू वृत्ती निर्माण करुन जिल्ह्यात नव्हे राज्यात नावलौकिक मिळवून दिला.माझ्या विवाह सोहळ्यात मा.बाबुराव माणिकराव पेठकर व मा.बालाजीराव गंगाराम पेठकर या दोन्ही माझ्या बंधूंनी व्यवस्थित देखरेख करत विवाह पार पाडण्यास मदत केली.


त्यांनी वडिलांच्या पाऊलावर पाऊल टाकून शेतीत मन रमवत लिंबू , ऊस,केली अशी नानाविध पिके घेवून वडीलांचे कार्य अखंडीत सुरु ठेवले आहे.फळाचे विक्रमी उत्पादन करत माळेगाव यात्रेत अनेक बक्षीसे मिळवली.
नांदेड आकाशवाणीवर शेतीच्या नवनविन संकल्पना व शेती मार्गदर्शन या विषयावर मुलाखतीतून प्रबोधन केले. पंचायत समितीत कंधारच्या सभापती सौ.सत्यभामाबाई देवकांबळे यांच्या प्रतिनिधीच्या समर्थ हस्ते बचत भुवन कंधार येथे सत्कार झाला.त्यांनी ट्रेसर महासंघाचे अध्यक्ष पदही भुषविले आहे.ते शैक्षणिक पात्रताधारक व्यक्तीमत्व शेती व्यवसाय करण्यात रुचीवीर आहेत.त्यांनी मुलाला डाॅ.बनवले,अन् स्नुषा देखील डाॅक्टरच शोधली.त्यांनी अनेक प्रयोग शेतीत करुन आपल्या कल्पक शेती व्यवसायाची चुणुक दाखवली.त्यांचे स्वप्न होते.की नांदेड नगरीत एखादे घर बांधावे हे स्वप्न बालाजीरावांनी गेल्या वर्षी पुर्ण केले.आपल्या वडीलांचे स्वप्न पुर्ण करतांना समाधान मिळाल्याची भावना व्यक्त केली.आजही दोन वेळा नचुकता शेतीच्या निगराणीसाठी वेळ देतात.त्यांचे लिंबोनी फलोत्पादन शेतीचा प्रयत्न यशस्वी झाला.आज त्यांच्या लिंबोनीला पंचक्रोशीत प्रसिद्धी आहे.ते आपला सेवानिवृत्तीचा काळ शेती अन् समाज सेवेसाठी देणार आहेत.


शेतीतील नवनविन प्रयोगाने,
अधिकचे उपन्न काढले!
क्रांति नगरी बहाद्दरपुराचे,
नाव जिल्हाभर गाजवले!


लेखन

dattatrya yemekar


गोपाळसुत
दत्तात्रय एमेकर गुरुजी
क्रांतिभुवन बहाद्दरपुरा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *