लोहा प्रतिनिधी / शैलेश ढेबंरे
लोहा : भारत हा कृषिप्रधान देश असून , शेतकरी सततची नापीकी , गारपीट , दुष्काळ , अतिवृष्टी यामध्ये सतत होरपळून निघतो, शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले जाते. शेतकऱ्याचा माल हा कमी किंमतीत घेतला जातो यावर्षी शेतकऱ्यांचे सोयाबीन ३२०० रूपये क्वींटल दराने खरेदी केले व आज त्या सोयाबीनची किंमत ८००० रूपये झाली आहे याप्रकरणात शेतकरी हवादलीत झाला आहे. चालु वर्षीत डिएपी 10:26:26 व 12:32:16 या कंपनीने 50 किलोच्या बॅगमागे 700 रूपायांची वाढ केली असुन हि वाढ म्हणजे बळीराज्याच्या पाठीत खंजीर खुपसले होय हि वाढ शासनाने रद्द केली पाहिजे लाॅकडाऊनच्या नावाखाली बि बियाणाचा मोठा काळाबाजार होण्याची दाट शक्यता दिसुन येत असुन यासाठी यंत्रणा राबवावी अशी मागणी धर्मवीर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब जाधव सर यांनी केली आहे.
गेल्या वर्षी सारखेच यावर्षी पण बाजार बोगस बियाणे यांची दाट शक्यता आहे गतवर्षी सोयाबीनचे बियाणे बोगस आल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली तर काही शेतकऱ्यांनी तीन वेळेस सोयाबीनची पेरणी केली. गतवर्षीच्या बोगस बियाण्यांची आतपर्यंत चौकशी झाली नाही व त्या कंपनीवर रितसर कार्यवाही अद्याप झालेली नाही. असे प्रतिपादन धर्मवीर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रा बाळासाहेब जाधव सर यांनी केले