लोहा पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक भागवत जायभाये आज दि.३० रोजी सेवानिवृत्त

लोहा / शैलेश ढेबंरे

लोहा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक भागवत जायभाये आज दिनांक ३० एप्रिल रोजी सेवानिवृत्त होत आहेत.
लोहा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक भागवत जायभाये यांनी गेल्या दीड वर्षापासून लोहा पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक म्हणून पदभार स्वीकारला व तो त्यांनी आपल्या दीड वर्षाच्या काळात लोकाभिमुख कार्य केले शहरातील अवैध धंदे बंद केले गुन्हेगारांवर वचक बसविली कोरोना व लाॅकडाऊनच्या काळात उल्लेखनीय कार्य केले‌ ते आज आपल्या ३१ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर निसर्गाच्या नियमाप्रमाणे व वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत.


पोलीस निरीक्षक भागवत जायभाये यांनी आपल्या ३१ वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्या महाराष्ट्रात विविध ठिकाणी सेवा बजावली.
१५ जून १९८९ रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यांची पोलीस उपनिरीक्षकपदी प्रथम निवड झाली. पोलीस उपनिरीक्षक म्हणून त्यांची निवड झाल्यानंतर १५ जून १९८९ ला पोलीस उपनिरीक्षक म्हणून नाशिक येथे प्रशिक्षण घेतले व प्रशिक्षण पुर्ण झाल्यानंतर नांदेड येथील शिवाजी नगर येथे परिक्षाधिन पोलिस उपनिरीक्षक म्हणून ६ महिने त्यांनी काम पाहिले. त्यानंतर किनवट येथे नक्षलवादी कार्यक्षेत्रात ६ महिने काम पाहिले.


त्यानंतर सिंदखेड येथे जानेवारी १९९१ ते जून १९९१,
दि.१३ आॅगसट १९९१ रोजी लोहा तालुक्यातील माळाकोळी पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलिस उपनिरीक्षक म्हणून कार्य केले. २० जुलै १९९३ ला मुकराबाद येथे बदली,१९९४ ते १९९७ नांदेड येथील विशेष सुरक्षा विभागात कार्य, १९९७ -९८ भाग्यनगर पोलीस स्टेशन, ९९९८-९९ ट्राफिक चा पदभार, १९९९ ते २००१ हिमायतनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार,२००१ ते२००३ भोकर इस्लापुर , २००३ ते २००४ उस्मानगर, २००४ ते २००५ विशेष शाखा नागपूर,२००५ ते २००८ हट्टा पोलीस स्टेशन ( हिंगोली जिल्हा ),२००८ ते२०१२ पाथर्डी , २०२१- १३ सुरक्षा विभाग श्री शिर्डी साईबाबा,२०१३-१४ राहता पोलीस स्टेशन अहमदनगर येथे पोलिस निरीक्षक म्हणून पदोन्नती ,२०१४ -१५ सटाना नाशिक ग्रामीण,२०१५-१७ विशेष शाखा मालेगाव २०१७ जिल्हा विशेष शाखा नांदेड,२०१८-१९ धर्माबाद पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक,२०१९-२० ते आजपावतो लोहा पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत आसुन अशाप्रकारे पोलिस निरीक्षक भागवत जायभाये यांनी ३१ वर्ष अशी पोलीस दलात प्रदिर्घकाळ सेवा बजावली असून त्यांनी नांदेड जिल्ह्यात १३ वर्ष सेवा बजावली असून यात त्यांनी ८ पोलीस स्टेशन व ट्राफिक मध्ये कार्य केले. असुन या कर्तृत्ववान पोलीस निरीक्षक भागवत जायभाये आज लोहा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक म्हणून सेवानिवृत्त होत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *