लोहा प्रतिनिधी
लोहा : कोरोना नियंत्रणासाठी एकिकडे जिल्हा प्रशासनाने व राज्य सरकारने राज्यात १५ मे पर्यंत संचारबंदी लागू केली आहे.या संचारबंदीचा फायदा घेत शेलगाव परीसरात नदीपात्रात वाळु माफियांना धुमाकूळ घातला असुन याकडे तालुका प्रशासन , महसुल विभाग डोळे झाक करत व निवेदन दिले असताना वाळु उपसा जोमात सुरू असल्याने प्रशासनाने वाळु माफियांसोबत हातमिळवणी केली आहे अशी प्रतिक्रिया शेलगाव येथील संतृप्त शेतकऱ्यांची येत आहे.
शेलगाव येथील नदीपात्रात अवैधरित्या होत असलेला वाळु उपस्याला शासनाचे नियम व संचारबंदीचे नियम लागु होत नाहीत का असा सवाल शेलगाव येथील संतृप्त शेतकरी बांधव करत आहेत.शासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्त मंडळी करत आहेत.गतवर्षी मा जिल्हाधिकारी साहेब यांनी स्वता येऊन वाळु उत्खन बंद केले होते.यावर्षी वाळु माफीयांनी जोमाने वाळु उत्खन सुरू केले आहे. संबंधित शेतकऱ्याने मा तहसीलदार साहेबांना निवेदन देऊनही वाळु उत्खन थांबले नसल्याचे शेतकरी बांधवांनी स्पष्ट केले आहे. सदरील नदीपात्रातील वाळू वाहतूक , वाळु उपसा बंद करण्यात यावा अशी मागणी शेलगाव येथील संतृप्त शेतकऱ्यांनी केली आहे.