हरवलेले बालपण…..!

शिवास्त्र : 

जगण्यासाठी खाणे की खाण्यासाठी जगणे हा प्रश्न नेहमीच चर्चिला जातो. माणूस काय खातो त्यापेक्षा कोणत्या वातावरणात खातो हे जास्त महत्त्वाचे. चिंता ताणतणाव असल्यास पंचपक्वान्न किंवा सुकामेवा सुध्दा उपयोगी नसतो व सुखीसमाधानी मनाने अन् आनंदीवृत्तीने खाल्लेली चटणी-भाकर अंगी लागते हे विज्ञानाने सुध्दा मान्य केलयं. 
पुर्वी एकत्रित कुटुंब होती, आईने केलेल्या दुरडीभर भाकरी दहा मिनिटात फस्त व्हायच्या. शेतात पंगत बसली अन् सगळी पोटभर जेवली की आईच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसायचा त्या आनंदाची बरोबरी आज कशाला येईल का.? जेवण झाल्यावर तिच्या पदराला हात-तोंड पुसल्यावर पाठीवरून फिरणारा तिचा हात, हा अनुभव शब्दात मांडणे शक्य नाही. 
ऐ जिंदगी, गर दम है तो कर दे इतनी सी खता; मेरा बचपन तो छीन लिया, बचपना छीन के बता… जगतगुरु तुकाराम महाराज “लहानपण देगा देवा” म्हणत बालपण मागतात – निरागस, निर्मळ, निष्कपट, निस्वार्थ बालपण – हरवलेले बालपण सापडणे एवढे का सोपे आहे.? निसर्गाचे कालचक्र उलटे फिरणे कदापिही शक्य नाही, शरीराने नाही तर मनाने लहान व्हायला काय हरकत आहे.? तोच निरागस, निस्वार्थी, निष्कलंक, निष्कपट भाव मनी बाळगून…

इंजि. शिवाजीराजे पाटील बाभळीकर, नांदेड मास्टर कोच – जवाहरलाल नेहरू लिडरशिप इंन्स्टिट्युट, नवी दिल्ली  राष्ट्रीय अध्यक्ष – वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद  shivajiraje.patil@jnli. org.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *