बिलोली ; नागोराव कुडके
एके काळी रानभाज्यावर ताव मारणारी जणता हल्ली काळात सुधारीत संक्रीत जातिच्या भाजी पाल्याकडे वळल्याने मानवी शरीरासाठी उपयुक्त जिवनसत्व देणाऱ्या व दुर्मिळ होत चालेल्या या रानभाज्याना उजाळा देण्यासाठी राज्य शासनाकडुन कृषि विभागाच्या वतिने आयोजित रानभाजी महोत्सवाचे उदघाटन बिलोली येथे तालुका कृषि अधिकारी एस.बि. शितोळे यांच्या हस्ते आज ता.१० आँगस्ट रोजी तालुका कृषि कार्यालय येथे संपन्न झाले.
गेल्या अनेक शतका पासुन रानभाज्याचा आहारात सरासपणे ग्रामिण भागात मोठ्या प्रमाणात वापर होत आसताना कालांतराने हळुहळु शहरी भागातिल जनता ही या रानभाज्याचा वापर करीत आसे. निरोगी अरोग्याच्या दृष्टिकोनातून मानवी शरीरासाठी उपयुक्त जिवनसत्व या रानभाज्यातुन मिळत होते. आसे आजही वडीलो पर्जिताकडुन ऐकावयास मिळते.यामध्ये कुंदर,आंबाडी,घोळ,तरोटा,करटुले,चिंच चिगुर-फुल,तोंडाळे,पांदन पान,रान कारले,आघाळा,वसु,उंबर,रानशेवगा,डिकमली,बांबु,वाघाटे,आशा विविध शेकडो रानभाज्याचा दररोजच्या अहारात वापर केला जात आसे.सदरील रानभाज्यावर ना रासायनिक खताचा वापर ना किटकनाशकाचा फवारा यामुळे या रानभाज्याचा अरोग्याच्या दृष्टीने मोठे वरदानच होते.माञ हल्ली अधुनिक विज्ञान युवगात चक्क बाजारात सुधारीत संक्रीत वाणाचा भाजी पाला उपलब्धतेमुळे त्या कडे वळलेला जनतेचा कौल पहाता रानभाज्या माञ गेल्या काही दशका पासुन लोप पावल्यात जमा झाल्या आसुन या दुर्मिळ निरोगी रानभाज्याचा वापर व प्रचार व्हावा हा दृष्टिकोन समोर ठेऊन राज्य शासनाने कृषि विभागाच्या वतिने आज १० आँगस्ट रोजी रानभाजी महोत्सवाचे राज्यात आयोजन केले होते. त्यानुसार सदर महोत्सवाचे उदघाटन बिलोली येथे तालुका कृषि अधिकारी एस.बि.शितोळे यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी पञकार राजु पाटील शिंपाळकर कृषि परीषदेचे तालुका अध्यक्ष नामदेव पा.नरवाडे,आत्माचे तंत्रज्ञान व्यवस्थापक एस.जी.कांबळे कृषिसहायक चव्हाण , श्रीराम कोठे, सौ.वनरवार मँडम ,संतोष गोणशेटवार ,प्रकाश जेठे,राजु डुबकवाड ,सुशिल कंदुर्के आदीजन उपस्थिती होते .तसेच यावेळी तालुक्यातील काहि शेतक-यांनी विक्रीसाठी आणलेल्या विविध जातीच्या रानभाज्याची खरेदी देखिल करण्यात आली.