कंधार ; प्रतिनीधी
कंधार तालुक्यातील कुरुळा सर्कल हे मोठे बाजरपेठ व 24000लोकसख्या असलेले सर्कल आहे.सध्या या सर्कलमध्ये शंभराहुन आधिक कोरोना बाधिताची संख्या असुन येथिल लोकांच्या मानात भिती असल्यामुळे येथिल नागरीक टेस्ट करण्यासाठी भित आहेत.त्यामुळे नागरीक घे घरीच राहुन आंगावर आजार काढताना दिसत आहेत.कुरुळा सर्कलसाठी कुरुळा या गावितच कोविड सेंटर उभारले तर नागरीकांची भिती मरुन जाईल व स्टे करण्यासाठी नागरीक समोर येतील त्यामुळे शासनाने ही बाब लक्षात घेता कुरुळा येथे कोविड सेंटर उभारावे अशी मागणी ऑल इंडिया पँथर सेना जिल्हाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते माणिक ढवळे यांनी केली आहे.
सद्या राज्यात कोरोना व्हायरस या महामारीने तांडव घातला आहे.कंधार तालुक्याती कोरोना बाधिताची आकडेवारी आता कमी येत असल्याचे चित्र आसले तरी ग्रामीण भागातील नागरीक कोरोना टेस्ट करण्यास घाबरत आहेत. प्रशासनाकडून येणाऱ्या तिसऱ्या लाटेबद्दल पूर्वकल्पना याची यामुळे ग्रामीण भागात भीतीचे सावट आहे . यापूर्वी आलेल्या कोरोनाच्या दोन्ही लाटेत कुरुळा आणि परिसरातील लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. अनेक लोकं तपासणी अभावी किंवा तालुक्याच्या ठिकाणी कसं जावं या भीती पोटी अनेक लोकं उपचाराअभावी घरीच राहून स्वतःचं आणि पूर्ण कुटूंबाचं आरोग्य धोक्यात घालत आहेत त्याचा परिणाम परिसरातील नागरीकांनवर होताना दिसत आहे.कुरुळा सर्कल कंधार तालुक्यात आसले तरी मुखैड मतदार संघ असल्याने याकडे राजकीय पुढाऱ्यांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे..
कोविडचे भयानक परिस्थिती असताना सुध्दा लोकप्रतिनीधी फिरकत नसल्याने नागरीकांतुन नाराजीचा उमटत आहे. कुरुळा आणि भोवतालच्या परिसरातील नागरिकांचें आरोग्य उत्तम राहण्याकरिता व कोरोना परिस्थितीतून नागरिकांना वाचवण्याकरिता कुरुळा येथे कोव्हीड सेंटर ची नितांत आवश्यकता आहे .
यासाठी कुरुळा आणि कुरुळा परिसराचे नेत्रत्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणे गरजेचे आसल्याच्या भावना नागरीकांतुन व्यक्त होत आहेत. येणाऱ्या तिसऱ्या लाटेचे गाभिंर्य घेऊन लोकप्रतिनीधी व जिल्हा परिषद सदस्य यांनी लक्ष घालुन कुरुळा येथे कोविड सेंटर उभारण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी ऑल इंडिया पँथर सेना जिल्हाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते माणिक ढवळे यांनी केली आहे.