कंधार ; प्रतिनीधी
महात्मा बसवेश्वरयांची890 वी जंयती मोठ्या उत्सहाने साजरी केली जाईल असे वाटत असतानाच महाराष्ट्रात कोरोतणाची दुसरी लाट आली असल्याने जंयतीवर कोरोनाचे सावट आले आहे.कोरोना व्हायरचे गांभिर्य घेत शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.मनोहर धोंडे यांनी घरात राहुनच व सुरक्षित राहुन जंयती साजरी करा असे अहवान केले होते या अहवानाला प्रतिसाद देत पानभोसी येथे शिवा संघटनेच्या वतिने साध्या पध्दतिने जयंती साजरी करण्यात आली.
. गत वर्षी पासुन देशभरात कोरोना महामारीचे संकट असल्याने गतवर्षी प्रमाणे याही वर्षी महात्मा बसवेश्वर यांची जयंती घरी राहूनच साध्या पद्धतीने साजरी करा असे आव्हान शिवा संघटनेचे प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी केले होते या आव्हानाला प्रतिसाद देतात पानभोसि येथे शिवा संघटनेच्या वतीने महात्मा बसवेश्वर जयंती यांची जयंती साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली पानभोसी येथे सरपंच सौ राजश्री भोसीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी माजी संरपंच राजेंद्र भोसीकर,उपसरपंच शिवकुमार भोसीकर, मनोहर भोसिकर ,शिवा संघटनेचे तालुका उपाध्यक्ष बालीजी डोम ,त्रंबक भोसीकर हे उपस्थित होते.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधीलकी जपत मुरणुकीवर होणारा खर्च टाळत शिवा संघटनेच्यावतीने कंधार कोविड सेंटर येथील आरोग्य कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर,हैंड ग्लोज,मास्क, फळे व मिनरल वॉटर ची भेट देण्यात आली.यावेळी
शिवराज पाटील भोसिकर टी बि भोसिकर विशाल गोंड मनोहर नाईकवाडे विश्वनाथ भोसीकर प्रदिप भोसिकर विश्वाबंर पांचाळ किशनमहाराज स्वामी नारायण भोसिकर आदी सह शिवा संघटनेचे मावळे उपस्थित होते.