बहाद्दरपुरा ; प्रतिनिधी
नेहमीच महापुरुषांची जयंती व राष्ट्रीय सण हे लोकोपयोगी व नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून साजरी करणाऱ्या जय हिंद प्रतिष्ठाण क्रांतिभुवन बहाद्दरपुरा, यांनी या वर्षीच्या महात्मा बसवेश्वर जयंती व छ.शंभू महाराज जयंती चे औचित्य साधून तमाम तरुणांच्या योगदानातून संपूर्ण गावात *'आर्सेनिक अल्बम 30' या गोळ्यांचे घरपोच वाटप* करण्याचा उपक्रम राबवून महात्मा बसवेश्वराना अभिवादन केले.
तसेच कोरोना च्या संकटाला प्रतिबंध करण्यासाठी जय हिंद प्रतिष्ठाण ने परिसरात आज पासून सात दिवस *" कै. विठ्ठलराव पा. पेठकर स्मृती वाफ सप्ताहा" चे पालन करण्याचा संकल्प* केला. व सर्वांना या वाफ सप्ताहाच्या निमित्ताने दररोज वाफ घेण्याचे आवाहन केले आहे.वाफ घेण्यासंबंधी व आर्सेनिक अल्बम गोळ्या विषयी नगरीतील डॉ. राजपूत यांनी सर्व गावकऱ्यांना मार्गदर्शन केले व सदरील उपक्रम आरोग्याच्या दृष्टीने गरजेचा असल्याने यास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देण्याचे आवाहन केले.
प्रतिष्ठानतर्फे एकात्मतेची व स्त्री सन्मानाची शपथ घेणे, परिसरातील व्यापाऱ्यांना कचरा कुंड्यांचे वाटप करणे, रक्तदान शिबिराचे आयोजन करणे व यावेळी आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप व नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून *"वाफ साप्ताहा"* चे पालन करण्याचा संकल्प केला व महापुरुषांना अभिवादन केले. त्यामुळे सर्वांनकडून जय हिंद प्रतिष्ठाण च्या या उपक्रमास मोठा प्रतिसाद मिळत आहे व कौतुक केले जात आहे.
बहाद्दरपुरा येथील महादेव मंदिरात महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले व गावातील छत्रपती शिवाजी महाराज,शाहीर अण्णाभाऊ साठे,जिवाजी महाले व द्वादशभूजा देवी यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी गावातील प्रतिष्टीत मंडळींनी भेट दिली व तरुणांचे कौतुक केले. या उपक्रमासाठी प्रतिष्ठाण च्या सर्व युवकांनी परिश्रम घेतले .
जय हिंद!
टीप: सर्वांनी दररोज वाफ घेऊन वाफ साप्ताहाचे पालन करून कोरोनास प्रतिबंध करावे हि विनंती.
अनिल . .व ट्मवार