महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्य कुरुळा येथिल आरोग्य केंद्रास औषधी भेट

कुरुळा ; विठ्ठल चिवडे

मागील काही दिवसांपासून कुरुळा प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधींचा तुटवडा जाणवत होता ही बाब सकाळ ने प्रसिद्ध केली होती त्याचाच एक भाग म्हणून कुरुळा येथील शिवम पाटील मरशिवणे यांनी दिवंगत हरिहर पाटील मरशिवणे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ म.बसवेश्वर जयंतीचे औचित्य साधून अत्यावश्यक औषधी भेट दिली.

कोरोना काळात कुरुळा प्राथमिक आरोग्य केंद्रात अत्यावश्यक औषधींचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत होता.त्यामुळे गरजू रुग्णांना खाजगीतून औषधी खरेदी करावी लागत आहे.अत्यावश्यक औषधी उपलब्ध नसल्यामुळे गोरगरीब रुग्णांना आर्थिक झळ सोसावी लागत असून त्यासंदर्भात सकाळ ने वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. यामुळे शिवम पाटील या युवकाने मदतीसाठी एक पाऊल पुढे टाकत अत्यावश्यक औषधींच्या स्वरूपात भेट दिली आहे.माजी उपसरपंच दिवंगत हरिहर पाटील मरशिवणे यांच्या स्मरणार्थ बसव जयंतीचे औचित्य साधून आपण ही भेट देत असल्याचे शिवम यांनी सकाळशी बोलताना सांगितले. अशी परिस्थिती असतानाही प्रशासन अजूनही बघ्याच्या भूमिकेत असल्याचे चित्र आहे. जयंती उत्सव,वाढदिवस आणि इतर कार्यक्रमावर होणारी उधळपट्टी थांबवून अशी लोकोपयोगी कृती निश्चितच माणुसकीला बळ देणारी आहे.समाजकारणाचा आव आणणाऱ्यासाठी कुठलीही मोठी पार्श्वभूमी नसताना शिवम पाटील या युवकाचे कार्य इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *