युवा नेते शहाजी नळगे यांनी दिला योगशिक्षक नीळकंठ मोरे यांना ५० हजाराचा लॕपटॉप भेट ;कोरोना काळात गुगल मिटवर योगा कार्याची घेतली दखल

कंधार ;तालुका प्रतिनिधी

कोरोना काळात गुगल मिटच्या माध्यमातून असंख्य गरजवंताना आपल्या योगाच्या माध्यमातून दररोज योगाची सेवा देणाऱ्या व प्रतिकारशक्ती वाढवणा-या कंधार पतंजली योग समितीचे योगशिक्षक नीळकंठ मोरे यांंना त्यांच्या कार्याची दखल घेवून कंधार नगरपालीकेचे नगरसेवक युवानेता शहाजी नळगे यांनी कोरोना काळात बिमारासह सर्वसामान्य नागरीकांना अविरत पणे योगाचे धडे देता यावे म्हणून सुमारे ५० हजार रुपयाचा लॕपटॉप अक्षय तृतीयाच्या मुहर्तावर भेट दिला नवसंजिवनी दिली.

युवानेते शहाजी अरविंदराव नळगे यांना सामाजिक कार्याची विशेष आवड आहे.आजपर्यत सामाजिक बाःधिलकीतुन अनेकांना सहाय्य केले.या कोरोना काळाच्या आधी कंधार शहरामाध्ये पाण्याचा दृष्काळ असताना आपल्या स्वखर्चातुन अनेक नगरामध्ये पाण्याची मोफत व्यवस्था केली.हारीत कंधार या वृक्षलागवडीच्या कामातही त्यांचा वाटा आहे.हरीत कंधार योजना अंतर्गत लावलेल्या वृक्षाना वाढवण्यासाठी मोफत पाणी योजना केली.सामाजिक कोणतेही कार्य असो त्यामध्ये शहाजी नळगे हे विशेष लक्षदेवुन तो कार्यक्रम पुर्णत्वास नेतात.

सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने अनेक ठिकाणी धावून जावुन ते मदत करतात. पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांचे निष्ठावान कार्यक्रते आहेत.कंधार नगरपालीकेच्या व्यापारी संकूलासाठी खुप प्रयत्न केले अडचणीवर मात करुन व्यापारीवर्गाचा प्रश्न सोडवला आहे.

कोरोना काळात असंख्य मित्रमंडळी कोरोनाचा संसर्ग होवून मृत्युमुखी पडत आहेत.यासाठी शासन विविध उपाय योजना करत आहे.असे असताना कोरोना काळात कंधार येथे गेल्या दीड – दोन महिण्यापासून कंधार शहरासह नांदेड जिल्हा व महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यातील गरजवंत योगसाधकांना गुगल मिटच्या माध्यमातुन योगा शिकवण्याचे काम येथील योगशिक्षक नीळकंठ मोरे हे मोबाईलच्या माध्यमातून करत आहेत हे समजले परंतु त्यांच्या कडे तांत्रिक बाबीची कमतरता असल्याचे योगाच्या व्हाटसअप ग्रुपवर समजले व सर्व योगसाधक मिळून लॕपटॉप देण्यासाठी चंदा संकलन करत असल्याचे युवानेते शहाजी नळगे यांना समजताच त्यांनी तात्काळ योगशिक्षक नीळकंठ मोरे यांच्या निवासस्थानी जावून समस्या जाणून घेतली व क्षणाचा विलंब न करता लॕपटॉप देणार असल्याचे सांगून योगाच्या कार्यात खंड पडू देवू नका असे आवाहन केले.

बोले तैसे चाले या उक्ती प्रमाणे युवानेते शहाजी नळगे यांनी दि.१४ रोजी अक्षय तृतीयाच्या शुभमुहर्तावर सुमारे ५० हजार रुपये किमतीचे लॕपटॉप भेट दिले.व त्याच लॕपटॉपवरुन गुगल मिटद्वारे असंख्य योगसाधकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.व कोरोना काळात नीळकंठ मोरे यांचे कार्य अनेकांचे जीव वाचवत असून कोरोना रुग्ण तसेच अनेक बिमारी व आरोग्याची समस्या असणारे नागरीक योगाचा लाभ घेत असल्याचे सांगून भेट दिलेल्या लॕपटॉप मुळे अनेकांना योगामध्ये सहभाग घेता येणार असून कंधार तालुक्यासह जिल्हातील जास्तीत जास्त गरजवंतानी या योगसाधनेचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी शहाजी नळगे यांनी केले.

यावेळी शिक्षक नेते बालाजी पांडागळे ,अनिल वट्टमवार,पत्रकार मुरलीधर थोटे,लातुर येथील प्रा.निशिज कुलकर्णी ,उमरी येथील विक्रम सोळंके सर ,सुकेशनी फुलवळकर मॕडम,पत्रकार धोंडीबा बोरगावे,दत्तात्रय एमेकर व डॉ.रामभाऊ तायडे
आदीनी याच कार्यक्रमात मनोगत व्यक्त करुन युवानेते शहाजी नळगे यांनी केलेल्या मदतीमुळे कोरोना काळात अनेकांना भितीच्या वातावरणातुन सावरण्यास मदत होवून वेळप्रसंगी नीळकंठ मोरे यांच्या माध्यमातुन अनेकांचे जीव वाचवणारी ठरणार असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन दिगांबर वाघमारे यांनी तर आभार काशीनाथ पवार यांनी मानले.यावेळी वैजनाथ जक्कलवाड ,दृष्टांत एमेकर ,दीपक मोरे,मारोती गिते सर ,अमित लोंड सर आदीनी कार्यक्रमाचे नियोजन केले.हा लोकार्पण सोहळा गुगलषमिटद्वारे योगसाधकांनी घरी राहुन पाहीला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *