चक्रीवादळाच्या तडाख्याने जनजीवन विस्कळित

अरबी समुद्रात तयार झालेलं तोक्ते चक्रीवादळ तासागणिक अधिक सक्रिय होत असून त्याचा वेगही वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या वादळामुळे महाराष्ट्रातील अनेक भागात वादळीवाऱ्यासह पावसाचीही शक्यता आहे. शिवाय किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोकण किनारपट्टीवर धडकल्याने मोठे नुकसान होत आहे. उर्वरित महाराष्ट्रातही जोराचे वारे वाहू शकतात, बेमोसमी पाऊस होऊ शकतो. गारपीट झाली तर फळबागांचे नुकसान होऊ शकते. आधीच कोरोनाने हैराण झालेल्या महाराष्ट्राला चक्रीवादळाच्या तेराव्या महिन्याला तोंड द्यावे लागत आहे.

महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील भागाला चक्रीवादळाचा धोका कायम असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत होता. अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण होण्यासारखी परिस्थिती आहे, मात्र हे वादळ कुठल्या दिशेनं जाईल हे काही सांगता आले नाही.

अरबी समुद्रात सध्या मोठ्या प्रमाणात दाट ढग जमा झाल्याचं इन्सॅट उपग्रहानं पाठवलेल्या ताज्या प्रतिमेतून स्पष्ट झालं. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 14 तारखेला अरेबियन समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार होईल आणि त्याची तीव्रता वाढून चक्रीवादळात रुपांतर होईल.

मुंबईतील प्रादेशिक हवामान केंद्राच्या शास्त्रज्ञ शुभांगी भुते यांच्या मते 16 तारखेला या चक्रीवादळाचा जोर वाढून महाराष्ट्र आणि गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर त्याचा प्रभाव जाणवेल. तिथे मुसळधार पाऊस आणि वादळी वारे पाहायला मिळतील. या हवामानाचा परिणाम मध्य महाराष्ट्रावरही पाहायला मिळेल.”

या दरम्यान अरबी समुद्रानं रुद्रावतार धारण केलेला दिसेल. वाऱ्याचा वेग 40 ते 50 ताशी किलोमीटर असेल आणि त्याची तीव्रता ताशी 60 किलोमीटरपर्यंत वाढूही शकते. त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये. ज्या बोटी समुद्रात आहेत, त्यांनी लवकरात लवकर परत यावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.

महाराष्ट्रात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबई, पालघर या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी किनारपट्टीवरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे

“मच्छिमारांनी खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये. नागरिकांनी समुद्रात पोहण्यासाठी जाऊ नये. समुद्र आणि खाडी किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे,” असं रायगडच्या उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार लक्षद्वीप आणि केरळच्या परिसरात हा कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र तिथून चक्रीवादळ पुढे कुठल्या दिशेनं सरकेल, हे आत्ताच सांगता येणार नाही.

इथून चक्रीवादळ पश्चिमेला ओमानच्या दिशेनं सरकू शकतं. ते पूर्वेला सरकलं, तर आधी भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील प्रदेशात त्याचा प्रभाव जाणवू शकतो आणि तिथून ते पुढे उत्तरेला गुजरात किंवा दक्षिण पाकिस्तानकडे सरकू शकतं. असा अंदाज आहे.

यंदाच्या मोसमातलं हे या परिसरातलं पहिलं चक्रीवादळ ठरू शकतं. या कमी दाबाच्या पट्ट्याचं चक्रीवादळात रुपांतर झालं, तर त्याला ‘तौकते’ हे नाव दिलं आहे. म्यानमारनं सुचवलेलं हे नाव आहे.

हिंदी महासागराच्या उत्तरेला म्हणजे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात एरवी मान्सूनपूर्व काळात म्हणजे एप्रिल-मे दरम्यान चक्रीवादळांची निर्मिती झालेली दिसते. यंदा मात्र मेच्या मध्यावर पहिलं वादळ अरबी समुद्रात निर्माण होण्याची चिन्हं आहेत.

कोव्हिडच्या दुसऱ्या लाटेदरम्यान पूर आणि मुसळधार पावसाचं संकट सरकारी यंत्रणा आणि आरोग्य सुविधांवरचा ताण वाढवू शकतं, असं केंद्रीय पृथ्वी-विज्ञान मंत्रालयाचे सचिव माधवन राजीवन यांनी म्हटलं आहे.

गेल्या वर्षी जूनच्या सुरुवातीला निसर्ग या चक्रीवादळाचा थेट तडाखा कोकण किनारपट्टीला बसला होता. अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे तोक्ते चक्रीवादळाची निर्मिती झालेली आहे. कोकण किनारपट्टीवरील सिंधुदूर्गला चक्रीवादळाचा प्रभाव हळूहळू जाणवू लागला होता. त्याची तीव्रता दुपारनंतर अधिक होण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने किनारपट्टीच्या 38 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता.

दोन दिवस या चक्रीवादळाचा प्रभाव सिंधुदुर्गच्या किनारपट्टीला जाणवू शकतो. मुसळधार पाऊस व वाऱ्यामुळे झाडांची पडझड आणि घरांचे नुकसान झाल्याचंही पाहायला मिळेल. सध्या जिल्ह्यामध्ये कोरोनाचे संकट असतानाच हे नवं संकट कोकणला सतावत आहे.

दरम्यान, अरबी सागरात तयार झालेलं आणि वेगाने घोंगावत असलेलं ‘तौत्के’ चक्रीवादळ येत्या १२ तासांत अक्राळ-विक्राळ रुप धारण करू शकतं, अशी धोक्याची सूचना हवामान विभागानं दिली आहे. मंगळवारी १८ मे सकाळपर्यंत हे वादळ गुजरातच्या तटाला धडक देण्याची शक्यता आहे, असंही हवामान विभागानं म्हटलं आहे. या चक्रीवादळाला ‘तौत्के’ हे नाव म्यानमारकडून देण्यात आलं आहे. भारतीय तटावर यंदाच्या वर्षात धडणारं हे पहिलंच चक्रीवादळ असेल.

भारत हवामान विज्ञान विभागाच्या म्हणण्यानुसार, दक्षिण अरब सागर आणि लक्षद्वीप क्षेत्रात गुरुवारी चक्रीवादळानं दबाव निर्माण केला आहे. शनिवारी पहाटेपर्यंत या दबावात आणखीन वाढ होईल आणि त्यानंतर पुढच्या २४ तासांत चक्रीवादळ भयंकर स्वरुप धारण करू शकतं.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे, पालघरमध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळतील तर यावेळी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांनी महत्त्वाचं काम नसल्यास घराबाहेर जाणं टाळावं. असं सुचित करण्यात येत‌ आहे.

भारतात करोना संक्रमणानं घातलेल्या थैमानादरम्यान आता आणखीन एका धोक्यानं देशाच्या चिंतेत भर टाकलीय. या चक्रीवादळामुळे भारतासमोर एक नवं आव्हान उभं केलंय. या आव्हानाला तोंड देण्यासाठी ‘राष्ट्रीय आपत्ती निवारण दला’च्या (NDRF) ५३ टीम तैनात करण्यात आल्या आहेत. या टीम्स महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू आणि गुजरात या राज्यांत केली जातेय.

चक्रीवादळाचा संभाव्य धोका लक्षात घेता केरळ सरकारनं रुग्णालयांची सक्षमता वाढवण्यासाठी राज्याला तत्काळ कमीत कमी ३०० मॅट्रीक टन ऑक्सिजन धाडण्याची केंद्र सरकारला विनंती केलीय. यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी एक पत्र पाठवलंय. भारतीय हवामान विज्ञान विभागानं १४-१५ मे दरम्यान चक्रीवादळाचा इशारा दिला आहे. तसंच राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस आणि वादळाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.

याच पार्श्वभूमीवर, शनिवारी सायंकाळी ५.०० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘तौत्के’ चक्रीवादळापूर्वी यंत्रणांचा आढावा घेण्यासाठी एक बैठक घेणार आहेत. या बैठकीत सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबतच, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारीही उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्राची राजधानी मुंबईत ‘तौत्के’ चक्रीवादळाच्या इशाऱ्यानंतर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी कोविड १९ लसीकरण मोहीम दोन दिवसांसाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे मुंबईत १५ मे आणि १६ मे रोजी लसीकरण मोहीम स्थगित राहणार आहे.

मच्छिमारांना समुद्रात जाण्यासाठी बंदी घालण्यात आलीय. तामिळनाडू आणि राजस्थानच्या काही भागांतही तौत्के चक्रीवादळानं मुसळधार पावसाची शक्यता आहे. चक्रीवादळाचा धोका ध्यानात घेता नौसेनेचे जहाज विमान, हेलिकॉप्टर, डायव्हर आणि आपत्ती निवारण गट तयार आहे.

शिवाय गुजरातशिवाय दीवच्या तटालाही या चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. लक्षद्वीपच्या खालच्या भागात पूराचा धोका वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाकडून वेगवेगळ्या भागांना लाल आणि नारंगी अलर्ट जारी केला आहे.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सोमवारीच चक्रीवादळाच्या पार्श्वभूमिवर महत्त्वाची सूचना जारी केली आहे. चक्रीवादळाचा धोका मुंबईलाही असल्यामुळे सर्व जंबो कोविड केंद्र स्टँडबाईवर ठेवण्यात आली आहेत आणि त्यांच्यातील रूग्णांना अन्य ठिकाणी हलवण्याची गरज आहे की नाही हे हवामानाच्या इशाऱ्यानुसार ठरवण्यात येणार आहे.

“सर्व जंबो कोविड सेंटर्सला स्टँडबायवर रहाण्यास सांगण्यात आलं आहे. गरज भासल्यास रुग्णांना इतर ठिकाणी हलवण्यात येईल. दुपारपर्यंत यासंबंधी महत्त्वाची माहिती येईल. आम्ही परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहोत,” अशी माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.

अधिक माहितीनुसार, बीकेसी कोविड सेंटरला २० रूग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. पालिकेकडून आदेश आल्यास रुग्ण हलवणार अशी माहिती बीकेसी कोविड सेंटरमधील डाॅ. राजेश डेरे यांनी दिली आहे. ज्यांची प्रकृती बरी आहे, येत्या काही दिवसात घरी पाठवले जाईल अशा रूग्णांना
मुलुंड कोविड सेंटरमधून हलवले आहे. २० ते २५ रूग्ण मुलुंड मिठागर कोविड सेंटरमध्ये हलवले आहेत. पाच रुग्ण मुलुंड जकात नाका येथे नवीन कोविड सेंटरमध्ये हलवण्यात आले आहेत. मुलुंड कोविड सेंटर आणि एम. टी. अगरवाल रूग्णालयाचे अधीक्षक डाॅ. प्रदीप आंग्रे यांनी ही माहिती दिली आहे.

मुंबई चक्रीवादळाच्या धोक्यामुळे सर्व लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आली आहेत. इतकंच नाहीतर वांद्रे वरळी सी लिंक हे 15 मे आणि 16 मे रोजी वाहतुकीसाठी बंद करण्यात आलं आहे.

भारतीय हवामान खात्याने(आयएमडी) शनिवारी दिेलेल्या माहितीनुसार, लक्षद्वीप आणि अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तीव्र झाल्यामुळे ‘तौक्ते’ चक्रीवादळ निर्माण झालं आहे. यामुळे 17 मे ते 18 मे दरम्यान भूस्खलन होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. या चक्रीवादळाचा परिणाम गुजरात, महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटक या पाच राज्यांमध्ये होणार आहे.

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे निर्माण झालेले तौत्के चक्रीवादळ आता रौद्ररूप धारण करत असल्याचं दिसत आहे. केरळ मध्ये या चक्रीवादळाचा परिणाम दिसू लागला आहे. चक्रीवादळामुळे समुद्र किनाऱ्यावरील घरांचे नुकसान होत असून समुद्रही खळवळा आहे आणि लाटा किनाऱ्यावर मोठ्या वेगाने धडकत आहेत.

तौत्के चक्रीवादळाचा परिणाम दक्षिणेकडील राज्यांत दिसू लागला आहे. केरळमधील किनारपट्टीच्या भागात असलेल्या कासारगोड येथे एक दुमजली बंगळा कोसळ्याची माहिती समोर आली आहे. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडीओत दिसत आहे की, समुद्र किनाऱ्यावर असलेला हा बंगला अवघ्या 10 सेकंदात कोसळला.

कासारगोड येथे समुद्र किनाऱ्यावर एक दुमजली बंगला होता. हा बंगला पाहता पाहता जमिनदोस्त झाला. केरळसह दक्षिणेकडील राज्यांच्या समुद्र किनाऱ्यावर या चक्रीवादळाचा फटका बसताना दिसत आहे.

चक्रीवादळामुळे मुंबई, कोकण, गुजरात, कर्नाटक, तमिळनाडू, पुदुच्चेरी, केरळ आणि लक्षद्वीप या ठिकाणी तुरळक ते विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच वादळी वारे ताशी 80 ते 90 किमी वेगाने वाहण्याचा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे.

पुढच्या 3 तासांत  चक्रीवादळ अधिक तीव्र होईल, तर पुढील 12 तासांत ते अतितीव्र रूप धारण करेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सध्या हे वादळ गोवा किनाऱ्यापासून 290 किमी, मुंबईपासून 650 किमी तर गुजरातपासून 880 किमी दूर आहे. उत्तरेच्या दिशेने ते 13 किमी प्रतितास या वेगाने पुढे सरकत आहे. आज 80 ते 115 या वेगाने वारे वाहणार आहेत. तर उद्या वाऱ्याची  गती ताशी115 ते 145 किमी अशी असेल. दक्षिण कोकण ते गोवा या पट्ट्यात मुसळधार ते अतिमूसळधार स्वरूपाचा पाऊस असेल. जिथे या चक्रीवादळाने जनजीवन प्रभावित होणार आहे त्या भागातील लोकांनी सावधगिरी बाळगावी, याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नाही, हेच खरे.

संपादकीय

गंगाधर ढवळे,नांदेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *