कोणताही व्यक्ती क्षत्रिय आहे. तुमचे कुळ कोणते आणि तुमची जात कोणती याला काडीचीही किंमत नाही. तुमच्याकडे लढण्याचे सामर्थ्य आहे ना? बस मग तुम्ही क्षत्रिय. आणि असे सामर्थ्य पळीपंचपात्र हाती घेऊन खचितच येत नाही…!
तुकोबांच्या या आवाहनाने इथल्या अठरापगड जातीतील लोकांना प्रेरणा मिळाली आणि धर्माच्या नावाखाली झाकून ठेवलेले त्यांचे क्षत्रियत्व उसळ्या मारू लागले. कीर्तनात जे हात टाळ, चिपळ्या आणि वीणा घ्यायचे तेच हात ढाल- तलवार हाती घेऊन रण- मैदान मारण्यासाठी फुरफुरू लागले. वेगवेगळ्या जातीधर्मातील लोक शिवरायांच्या सैन्यात मोठ्या प्रमाणात सामील होऊ लागले..!
दिनांक १६ मे २०२१ रोजी. गोपीनाथ जी. कांबळे, साहेब विशेष कर्तव्यावर अधिकारी मा. महाराष्ट्र सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री, यांना नांदेड येथे, स्वराज्य निर्मितीत तुकोबांचे योगदान डॉ. बालाजी जाधव लिखित हा ग्रंथ भेट देण्यात आले..!