कंधार ; प्रतिनिधी
कोरोणा माहामारी सुरु असताना सर्व सामान्य जनतेला महाघाईला तोंड दयावे लागत आहे.आता त्यात भर म्हणजे गोडतेल खाद्यतेल दरवाढीचे चटके सामान्य माणसाला बसत आहेत.शासनाने तात्काळ वाढलेले खाद्यतेलाचे भाव करावे अन्यथा संभाजी बिग्रेडच्या वतीने तिव्र अंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सोमवार दि.२४ मे रोजी तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
शेतक-यांच्या मालाला भोईमूग, सूर्यफुल, सोयाबीन आदि पिकाला पहिलाच भाव आहे. शेतक-यांच्या मालाला कवडीमोल किंमत देऊन हे शासन शेतक-यांची थटा करत आहे. आणि व्यापारी मालामाल होत आहेत. व्यापारी खाद्येतेल १६० ते २०० रुपये किलो दराने विकत आहेत.
तात्काळ शासनाने गोडलेलाचे भाव कमी करून सामान्य माणसाला दिलासा दयावा, अन्यथा संभाजी बिग्रेडच्या वतीने तिव्र आंदोलनाचा ईशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे ,जिल्हाधिकारी नांदेड ,उपविभागीय अधिकारी कंधार यांना देण्यात आल्या आहेत.
या निवेदनावर मराठा सेवा संघ जि. उपाध्यक्ष बळीराम पाटील पवार, संभाजी बिग्रेड संभाजी पा. गायकवाड, कंधार तालुका अध्यक्ष नितिन पा. कोकाटे,धनजंय कौसल्ये,विकास लुंगारे,गुणवंत कौसल्ये आदीच्या स्वाक्षरी आहेत.