कंधार ; प्रतिनिधी
कंधार तालुक्यातील वाखरड येथील एका मातंग समाजातील महिलेच्या घरी जाऊन तिचा हात पकडून विनयभंग करून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी दिनांक २२ मे शनिवारी रोजी महिला तक्रारदार यांच्या फिर्यादीवरून छेडखानी करुन जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या एका विरोधात विनयभंग व अँट्रसिटीचा गुन्हा कंधार पोलीसात दाखल करण्यात आला आहे.
मौ. वाखरड येथील सुभाष विश्वनाथ कागणे (४५) हा फिर्यादी महिलेकडे टकमक पाहून दररोज पाठलाग करून मानसिक त्रास देत होता.त्रास असह्य झाल्याने सदरील प्रकरण हे पीडित महिलेने आपल्या पतीला सांगून गावातील पोलीस पाटील बालाजी गीते यांना या प्रकरणात लक्ष देऊन आरोपी सुभाष कागणे यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.
परंतू दिनांक 21 मे रोजी सदर फिर्यादी महिलेच्या घरी कोणी नाही हे समजून आरोपी सुभाष कागणे याने तिचा हात पकडून तिला जवाळ ओढले व विनयभंग केला महीलेनी आरडाओरड केल्याने आरोपी सुभाष कागणे यानी सदर महीलेस जातीवाचक शिवीगाळ केली.याबाबत कंधार पोलिस स्टेशन येथे तक्रार दिली.
सदरील घटनेची माहीती मामा मित्र मंडळाचे संस्थापक मारोती मामा गायकवाड यांना समजताच सदर प्रकरणी पीडित महिलेला न्याय मिळावा म्हणून मारोती मामा गायकवाड यांनी पाठपुरावा केला .त्यावरून दिनांक 22 मे रोजी देगलूर बिलोली चे डीवायएसपी सोळुंके ,कंधार पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संग्राम जाधव ,बीट जमादार,व पोलीस घटनास्थळी जाऊन पाहणी केली व जबाब घेतला. महिलेच्या फिर्यादीवरून कंधार पोलिसात सुभाष कागणे विरुद्ध विनयभंग व ॲट्रसीटी चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.