पी.एम. केअर फंडातुन दोन ऑक्सीनज प्लॉट तात्काळ सुरु होणार ;प्रतापराव पाटील चिखलीकर यांची माहिती; प्ल्यांट ची केली पहाणी

नांदेड :- कोवीड- १९ चा पार्श्वभूमीवर यंत्रणा गतीमान करुन आरोग्यसेवा दर्जेदार करत रुग्नाना ऑक्सिजन चा पुरवठा मुबलक करण्यासाठी नांदेड येथे खासदार प्रतापराव पाटील यांच्या प्रयत्नातुन दोन ऑक्सीजन प्लॉट मंजूर झाले असुन त्या पैकी एक प्लॉट श्री गुरुगोविंदसिं शासकिय रुग्णालय येथे दिनांक ३० मे पर्यन्त सुरु होणार आहे.


दुसरा प्लॉट शंकररावजी चव्हाण शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी येथे दिनांक ३० जून पर्यन्त सुरु होणार आहे. वरील दोन्ही प्लॅन्ट हे पी.एम. केअर फंडातुन मंजूर करण्यात आले असुन अंदाजीत किमंत २.५० कोटी (दोन कोटी पन्नास लक्ष) रुपये आहे. आज खा. प्रतापराव पाटिल चिखलीकर यानी दोन्ही स्थालना भेटी देवून प्रत्यक्ष पहाणी केली.

सदरील काम हे युध्द पातळीवर पुर्ण होण्यासाठी केंद्र सरकार विविध मंत्रालयाची मदत घेत आहे. त्यापैकी राष्ट्रीय महामार्गाच्या वतीने सिव्हील वर्कची जबाबदारी घेतली आहे. तर संरक्षण मंत्रालयाच्या सैनिकी हेलीकॉप्टर मधुन सदर प्लॉट नांदेड येथे आणण्याची जबाबदारी घेतलेली आहे. महावितरन कडून विज पुरवठा केला जाणार आहे. सार्वजनीक बांधकाम विभागाने डी आर डी ओ ची जाबबदारी स्विकारली आहे. एका प्लॉटची क्षमता १ हजार (LPM) लिटर प्रतिमिनिट असुन असे दोन प्लॉन्ट मंजूर झाले आहेत. आज दोन्ही पल्यंट ची पहाणी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर जिल्हाधिकरी विपीन ईटनकर, जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर , भाजपा महानगर अध्यक्ष प्रवीण सांले जिल्हा शल्ये चिकित्सक डॉ निळकंठ भोसीकर, नॅशनल हायवेचे अधिकरी श्री सुनिल पाटील, अधिक्षक अभियंता सा.बा.श्री अविनाश अधिष्ठाता डॉ. दिलीप म्हैसेकर, डॉ. यादवराव चव्हाण, महावितरणचे अधीक्षक अभियंता व संबंधित सर्व अधिकारी
भाजपा सरचिटणीस विजय गंभीरे एडवोकेट दिलीप ठाकूर अनिल बोरगावकर माजी उपसभापती रोहित पाटील सुप्रीडेन्ट आदीची उपस्थिती होते.


दरम्यान या दोन्ही प्ल्यांट मुळे नांदेड़ जिल्ह्यातील रुग्नाना मोठा दिलासा मिळनार आहे. ओक्सीजन चा तुटवठा निर्माण होणार नाही. आरोग्य सेवा अधिक दर्जेदार आणि रुग्णांच्या फायद्याची ठरणार असल्याचे खा.प्रतापराव पाटिल चिखलीकर यानी यावेळी संगितले.
खासदार प्रतापराव पाटील पाटील चिखलीकर यांनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग रस्ते वाहतूक मंत्री माननीय नितीन गडकरी आरोग्य मंत्री हर्षवर्धन भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *