ऑटोरिक्षा परवानाधारकांना सानुग्रह अनुदानासाठी ऑनलाईन अर्जाद्वारे माहिती नोंदविण्याचे आवाहनAutorickshaw-Financial-Assistance-Scheme

नांदेड :- कोविड-19 च्या पार्श्वभुमीवर राज्य शासनाने ऑटोरिक्षा परवानाधारकांना 1 हजार 500 रुपये सानुग्रह अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. हे अनुदान ऑटोरिक्षा परवानाधारकांच्याच बँक खात्यात ऑनलाईन जमा करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व ऑटोरिक्षा परवानाधारकांनी आपली ऑनलाइन माहिती स्वत:च्या मोबाईलवरुन किंवा सीएससी सेंटरवर जाऊन नोंदवावी. प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून खाजगी व्यक्ती अथवा कोणत्याही दलालाची नेमणूक केली नाही. परवानाधारकांनी अनाधिकृत व्यक्तीशी संपर्क करु नये, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी Autorickshaw-Financial-Assistance-Schemeकेले आहे.

शासनाने ऑटोरिक्षा परवानाधारकांना आर्थिक मदत देण्यासाठी https://transport.maharashtra.gov.in/1133/Autorickshaw-Financial-Assistance-Scheme ही प्रणाली विकसीत केली आहे. या प्रणालीत रिक्षा परवानाधारकाला स्वत:चे वाहन क्रमांक, अनुज्ञप्ती क्रमांक, आधार क्रमांक आदी माहितीची नोंद करावी लागणार आहे. नोंद केलेली माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून खात्री करून घेतली जाणार आहे. त्यानंतर सदर अर्ज हा अनुदान खात्यात जमा होण्यासाठी पुढील कार्यवाहीसाठी पाठविला जाणार येणार असल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

परवानाधारक रिक्षा चालकाला अर्ज करतांना अडचण आल्यास प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या [email protected] या ईमेल आयडीवर किंवा कार्यालयाच्या 02462-259900 या दूरध्वनी क्रमांकावर किंवा प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड येथे स्वत: येऊन संपर्क साधावा.Autorickshaw-Financial-Assistance-Scheme

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *