नांदेड ; प्रतिनिधी
पालकांनी खाऊसाठी दिलेले पैसे खर्च न करता गोरगरिबांच्या पोटाला अन्न मिळावे यासाठी अक्षद व आंचल आशिष काबरा या चिमुकल्यांनी 300 लॉयन्सच्या डब्यासाठी संयोजक धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्याकडे नऊ हजार रुपये जमा करून स्वतःच्या आचरणाने ज्येष्ठांपुढे एक नवीन उदाहरण ठेवले.
प्रसिद्ध उद्योजक आशिष काबरा यांचे अनेक सामाजिक कार्यात सक्रिय योगदान असते. वडिलांच्या चांगल्या कामाचा वारसा त्यांच्या मुलांनी जपल्याचे नुकतेच स्पष्ट झाले आहे. पोद्दार इंटरनॅशनल स्कूल मध्ये आठवीत शिकणारा अक्षद आणि तिसरीची आंचल यांना त्यांच्या आई सौ अर्चना आशिष काबरा यांनी बचतीचे बाळकडू बालपणापासून पाजले आहे. अक्षदने वर्तमानपत्रातून लायन्स क्लबला डबे कमी पडत असल्याचे वाचले होते. त्यानुसार आई वडिलांशी चर्चा करून दिलीपभाऊंना घरी बोलावले. अक्षय अक्षद पिग्गी बँकेत 5740 रुपये तर आंचल कडे 2910 रुपये जमा झाले होते. 300 डब्यासाठी कमी पडत असलेली रक्कम आईने मिसळून नऊ हजार रुपये दिलीप ठाकूर यांच्या स्वाधीन केले दिलीप भाऊंनी रीतसर पावती या दोघा चिमुकल्यांना दिली. या दोघांशिवाय शुक्रवारी कै.गंगाधरराव विष्णूपुरीकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त विजया व शिरीष विष्णूपुरीकर तर्फे100 डबे,पंजाबराव देशमुख यांच्या तर्फे 50 गोड जेवण,डॉ. बिलोलीकर अश्विनी हॉस्पिटल यांच्यातर्फे 50 व्यक्तींना मिष्ठान्न भोजन,डॉ. विशाल व दिव्या राठी ,मंगरुलपीर जि.वाशिम यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त 50 डबे,व्यंकटेश पंचलिंगे तरोडानाका यांच्यातर्फे 50 डबे वितरित करण्यात आले. डबे वितरण करण्यासाठी दिलीप ठाकूर यांच्या समवेत अरुणकुमार काबरा, प्रशांत पळसकर, सुरेश शर्मा, केदार महेश निलेवाड , मन्मथ स्वामी, राजेशसिंह ठाकूर, विशाल दुधमल, परिश्रम घेतले. लॉकडाउन संपेपर्यंत लॉयन्सचा डबा हा उपक्रम सुरू असणार असल्यामुळे दानशूर नागरिकांनी सढळ हाताने मदत करावी असे आवाहन सेंट्रलचे सेंट्रल अध्यक्ष लॉ.संजय अग्रवाल , सचिव लॉ.ॲड. उमेश मेगदे, कोषाध्यक्ष लॉ. सुनील साबू, प्रोजेक्टर चेअरमन
लॉ.अरुणकुमार काबरा यांच्यासह
लॉयन्स क्लब नांदेड अन्नपूर्णा चे
सचिव लॉ.धनराजसिंह ठाकूर,कोषाध्यक्ष लॉ. अनिल चिद्रावार,प्रोजेक्टर चेअरमन राजेशसिंह ठाकूर यांनी केले आहे.