कंधार ; प्रतिनिधी
कोरोनाचा कहर संपता संपत नाही आणि टाळेबंदी तर वाढतच चालली आहे दिवसें दिवस संसर्गजन्य व रुग्ण वाढत असताना घरात राहणे हा संसर्गाला रोखण्याचा पर्याय असून त्यामुळे शासनाने विविध देवस्थाने बंद केली आहे म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३१ मे रोजी २९६ वी जयंती घरातच उत्साहाने साजरी करावी असे आव्हान धनगर समाज युवा मल्हार सेनेचे संस्थापक अध्यक्ष मनोज सिराम सर यांच्या अध्यक्षतेखाली सर्व वरिष्ठ पदाधिकारी सरसेनापती प्रकाशभैया सोनसळे प्रदेशाध्यक्ष विनोद अण्णा खेमनार.सामाजिक कार्यकर्ता तथा नांदेड जिल्हाउपाध्यक्ष मा.गणेश पाटील वरवंटकर आदीनी समाज बांधवाना आवाहन केले आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी ही सर्व धनगर समाजाची आराध्य दैवत आहे यांच्या जयंती दरम्यान आपल्या घरावर शक्य होईल तर पिवळे झेंडे लावावे पोलिस डॉक्टर व सफाई कर्मचारी यांचे स्वागत करायचे आहे व मेंढपाळ बांधवांना मदत करून लसीचे महत्त्व पटवून द्यायचे आहे व तसेच समाजातील गोरगरीब जनतेला लसीचे महत्व पटवून द्यायचे आहे असे आव्हान नांदेड जिल्हाचे सामाजिक कार्यकर्त मा.गणेश पाटील वरवंटकर यांनी केले आहे