संभाजी राजांनी शिवरायांनी मिळविलेले स्वराज दुप्पटीहून अधिक वाढविले. सैन्य, खजिना व एकूण उत्पादन क्षमता यात त्यांनी जवळजवळ तिप्पट भर घातली. संभाजी राजे अत्यंत विद्दवान व अभ्यासू होते. त्यांना आठ भाषा येत होत्या. ते प्रतिभाशाली लेखक होते..!
त्यांनी ‘बुधभूषण’ या संस्कृत ग्रंथाचे तसेच ‘नखशिख’ , ‘सातसतक’ व नायकाभेद’ या पुस्तकांचे लेखन केले. छत्रपती संभाजी महाराज मराठा इतिहासातील एक वलयांकित व्यक्तिमत्त्व संपूर्ण युवा वर्गाला एक आदर्श प्रतीक म्हणून ज्या प्रेरणादायी इतिहास पुरुषांचे नाव सांगता येईल ते म्हणजे संभाजी महाराज केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र एवढीच त्यांची ओळख नाही. एखाद्या कर्तृत्ववान महापुरुषांच्या घरात जन्म झाला म्हणून कोणी मोठे होत नसते. तसे मोठपण मिळाले तरी ते क्षणिक असते. परंतु छत्रपती संभाजीमहाराजांनी स्वकर्तृत्व, पराक्रम व स्वच्छ चारित्र्य या माध्यमातून हा आदर्श निर्माण केला आहे..!
अशा महान महापुरुषांचे प्रेरणादायी विचार प्रत्येक नागरिकांमध्ये रुजले पाहिजे. म्हणून दिनांक २८ मे २०२१ रोजी. वधु चि. सौ. का. राहू किशनराव पा. शिंदे रा. दरेगाव ता. नायगाव जि. नांदेड यांची कन्या व वर चि. मारोती सदाशिव पा. चव्हाण रा. नायगाव बाजार ता. नायगाव जि. नांदेड यांचे चिरंजीव यांच्या शुभविवाहप्रसंगी मौजे दरेगाव ता. नायगाव जि. नांदेड येथे, वधू वरांना पुढील सुखमय जीवन वाटचालीस शुभेच्छा म्हणून, साहित्यिक प्रेमचंद अहिरराव लिखित शंभूगाथा समग्र बोधकथा हा ग्रंथ भेट देण्यात आला. आणि शुभेच्छा देण्यात आल्या..!
याप्रसंगी,
मा. डॉ. हनुमंत भोपाळे, सुप्रसिद्ध साहित्यिक नांदेड, मा. प्रदीप पा. शिंदे माजी. सरपंच दरेगाव, मा. कोंडीबा बैलके सहशिक्षक, यासह अनेकजण उपस्थित होते..!
✒️- सोनू दरेगावकर, नांदेड..!
🗒️- दिनांक २८ मे २०२१