नांदेड आकाशवाणी लोकशिक्षणाचे प्रभावी माध्यम आहे -अशोक कुबडे

नांदेड ; प्रतिनिधी

आज २९ मे….
आकाशवाणी नांदेड केंद्राचा ३० वा वर्धापन दिन..
गेली ३० वर्ग आकाशवाणी खेडोपाडी वाड्या वस्तीत जाऊन मनोरंजन करते आहे.माहिती मनोरंजन आणि प्रबोधन या त्रिसुत्रीत सतत प्रवाही रहाणारी आकाशवाणी जनमानसाची ज्ञानवाणी झाली आहे.नांदेड आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी आमचे मार्गदर्शक मा.विश्वास वाघमारे सरांना शुभेच्छा देतो..आपल्या कार्यकुशालतेने आकाशवाणीला ते विविध कार्यक्रम देऊन त्याचे नियोजन करुन माहिती मनोरंजन आणि प्रबोधनाचा वसा चालवातात त्या सोबत प्रसारण अधिकारी मा.राहुल अत्राम सर आगदी कार्यतत्पर आणि नवनवीन कार्यक्रम देण्यात कुशल आहेत.ज्येष्ठ निवेदक मा.गणेश धोबे सर यांच्यातून कार्यक्रम प्रवाही होतात…३० मे १९९१ नांदेड आकाशवाणीची सुरुवात झाली आणि नांदेड येथिल भिमराव शेळके सर तेव्हा कार्यक्रम अधिकारी म्हणून रुजू झाले..त्यांच्या कर्तव्यात नांदेड आकाशवाणी बहरत गेली.आणि जनमानसाच्या गळ्यातील ताईत झाली.त्यामुळे नांदेड आकाशवाणी आणि भिमराव शेळके हे समिकरण तयार झालं ते कायम आहे.आज सर आपल्यात नाहीत पण नांदेड आकाशवाणीचा प्रसार आणि प्रचार करण्यात मा.शेळके सरांच योगदान हे मैलाचा दगड असून ते कायम असणार आहे.सरांच मार्गदर्शन आम्हाला नेहमी मिळालं हे विसरता येणार नाही.गेली ३० वर्षा पासुन ही आकाशवाणी प्रबोधनाचा वसा घेऊन गावोगावी प्रबोधन करते..आकाशवाणीची ही ३० वर्षे अगदी सहज आणि उत्साहात गेलीत.आपल्या आकाशवाणीतून श्रोत्यांशी संवाद साधण्याचा वेगळा आनंद मिळतो.आकाशवाणी हे संवादाचे प्रभावी माध्यम आहे…आकाशवाणीचे विविध कार्यक्रम हे सर्वांना लक्षात घेऊन तयार केले जातात.बालमित्रांसाठी गंमत जंमत / युवावाणी / किसानवाणी,महिला भगिनींसाठी घर-संसार, फोन फर्माईस असे अनेक कार्यक्रम श्रोत्यांचे आवडते कार्यक्रम आहेत..यातून माहिती मनोरंजन आणि प्रबोधन होत..आकाशवाणी हे…बहुजन हिताय.बहुजन सुखाय हे ब्रिद घेऊन मनामनात वास्तव्य करते…लोकशिक्षणाचं माध्यम म्हणून आकाशवाणी घराघरात प्रवाहित आहे.ही ज्ञानगंगा घरोघर अशीच वहाती रहावी आणि समाज प्रबोधन करावी हीच यावेळी अपेक्षा व्यक्त करातो…
आणि आकाशवाणीच्या पुढील वाटचालिस मनःपूर्वक शुभेच्छा देतो…!


आकाशवाणीच्या वर्धापन दिना निमित्त हार्दिक शुभेच्छा…!!

अशोक कुबडे

“”””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *