आकाशवाणी नांदेड


आज २९ मे २०२१ . आकाशवाणी नांदेड केंद्राचा ३० वा वर्धापन दिन. प्रथमतः नांदेड आकाशवाणी केंद्राच्या ३० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने सर्व अधिकारी , कर्मचारी आणी नैमित्तिक – प्रासंगिक उदघोषक यांना खूप खूप शुभेच्छा. आकाशवाणीच्या सर्वदुर पसरलेल्या सर्वच रसिकांना लाखभर शुभेच्छा !


मुळात नांदेड आकाशवाणीच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने प्रतिसादपर, छोटी प्रतिक्रिया, लेख लिहावं. असा विचार नव्हता. तर ९४०४७६१२५२ या नांदेड आकाशवाणीच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर प्रतिक्रिया द्यायची होती. त्यामुळे ती प्रतिक्रिया मी लिहून काढली. ती लिहताना उगाच मनात आलं की आकाशवाणीने दिलेल्या निवेदनानुसार, निर्धारित वेळेत म्हणजे २८ मे च्या दुपारी १२ : ३० – ०१ : ०० ,जर आपला फोन नाही लागला तर………. तर आपण ही प्रतिक्रिया आणि हया शुभेच्छा अधिक वाडयू या आणि वर्तमानपत्रात प्रकाशित करण्यासाठी पाठवू या. म्हणजे हा लेख ऐनवेळीचा निर्णय आहे.पण प्रयत्ना अंती परमेश्वर या नुसार उशिरा का होइना फोन लागला आणि माझी प्रतिक्रिया ध्वनीमुद्रीत झाली आहे.


लिहलेली प्रतिक्रिया असी आहे. मी भगवान कि आमलापुरे. गाव फुलवळ,ता कंधार. हल्ली मुक्काम अहमदपुर.मला सकाळी लवकर जाग आली तर सकाळी सकाळी ०६ : १० वाजताचा चिंतन, विचारपुष्प हा कार्यक्रम मी ऐकतो. आजही ( दि २८ मे २१ ) तो कार्यक्रम मी ऐकला आहे. आज या कार्यक्रमात प्रा भगवंत देशमुख यांची, ‘ स्पर्श ‘ या विषयावरची ध्वनीमुद्रीका आकाशवाणीने ऐकवली आहे.त्यानंतरही मी उपलब्ध वेळेनुसार काही कार्यक्रम ऐकतो.
कोवीड १९, कोरोना काळात नांदेड आकाशवाणीने वेळोवेळी वेगवेगळ्या डॉक्टरांच्या मुलाखती प्रसारित केल्या आहेत. त्यामुळे आमच्या ज्ञानात भर पडली आहे. आपण आपली काळजी घेतली तर, नियम पाळले तर कोरोना पासून स्वतःला वाचवू शकतो. हा आत्मविश्वास आकाशवाणीने श्रोत्यांच्या मनात तयार केला आणि जागवत ठेवला आहे.


यात अगदी अलिकडे उदभवलेल्या, नव्या कोऱ्या म्युकर मायकोसिस या आजारावर आधारित सुद्धा एक मुलाखत प्रसारित करण्यात आली आहे. ती पण मी अर्धवट ऐकलो आहे. काळाबरोबर अपडेट राहणारी आणि श्रोत्यांना अपडेट ठेवणारी आकाशवाणी नांदेड आहे. असं माझं मत आहे.
आज सर्वत्र डिजिटलचा बोलबाला आहे. त्यामुळे आकाशवाणीने पण श्रोत्यांना, आपल्या प्रतिक्रिया कळविण्यासाठी, पाठविण्यासाठी एक ई – मेल आय डी तयार करून दिला आहे.त्यामुळे कोरोना काळात कुठल्याही श्रोत्यास, आकाशवाणीला, कार्यक्रम ‘ सप्रेम नमस्कार ‘ साठी पत्र लिहण्यास घराबाहेर, बाजारात, टपाल कार्यालयात जाण्याची गरज उरली नाही. थोडा वेळ दिला की झाले. म्हणजे ई – मेलच्या माध्यमातून श्रोते आकाशवाणीसी जोडले जातात.


अलिकडे महिनाभरात सकाळी सकाळी मिश्रसंगीताचा कार्यक्रम प्रसारित करण्यात येत आहे. त्यामुळे श्रोत्यांची सकाळ अधिक संगीतमय झाली आहे,हसरी झाली आहे. शिवाय सकाळचे क्रषीसल्ला,परिसर – पर्यावरण,दिनविशेष, हिंदी देशभक्ती पर गीतांचा कार्यक्रम, हे कार्यक्रम जरी छोटे छोटे म्हणजे केवळ ०५ – ०५ मिनिटांचे असले तरीही ते ज्ञानवर्धक आणि आहेत. म्हणून ते short but sweet या संज्ञेत बसणारे आहेत.
तसा आकाशवाणीचा मी अर्धवेळ श्रोता आहे. तो यासाठी की अहमदपुरात नांदेड आकाशवाणी ऐकण्यासाठी मला छतावर मोबाईल घेऊन जावं लागतं. खोलीत ती चालत नाही. तरीही एक गोष्ट खरी आहे ती म्हणजे ज्ञान, आनंद आणि उत्साह ही आकाशवाणीची बाय प्राँडक्ट वाटतात.


नांदेड आकाशवाणीच्या ३० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मी एक संकल्प केला आहे. तो म्हणजे जयंत नारळीकर यांच्या एका पुस्तकाचे क्रमशः वाचन आकाशवाणी वरून सकाळी ०९ – ३० वाजता चालू आहे. ते क्रमशः वाचन मी आजपासून ऐकनार आहे. तुम्हा कानसेन रसिक श्रोत्यांना आणि चोखंदळ वाचकांना पण मी विनंती करतो की आपणही हे क्रमशः वाचन आँडीओ बुकसारखं ऐकावं आणि नांदेड आकाशवाणीसी नातं जोडावं.कारण वाचनाने आपण अधिक प्रगल्भ होऊ शकतो. शिवाय पुस्तक ऐकलं, वाचलं तर मस्तक प्रगल्भ होतं आणि प्रगल्भ झालेलं मस्तक सहजासहजी कुणाचेही हस्तक होत नाही.


मला वाटतं नांदेड आकाशवाणीच्या संदर्भातील आणखी दोन गोष्टींचा उल्लेख करावा लागतो. त्या शिवाय या लेखास पुर्णतः येणार नाही. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे हयात असताना, वडिलांना मी नांदेड आकाशवाणीची किट मागीतली होती. तर वडील म्हणाले, ‘ मला तसलं काही मागू नको. आपापल्या पायावर उभं टाक आन् आपापल्या कमाईचा रेडिओ विकत घे ‘. दुसरी गोष्ट म्हणजे एप्रिल २०१५ मध्ये नांदेड आकाशवाणी केंद्रावरील ,’ युवावाणी ‘ या कार्यक्रमात मी काव्यवाचन केलं होतं. परत एकदा नांदेड आकाशवाणी केंद्राच्या सर्व टिमला आणि सर्व श्रोत्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा ! धन्यवाद.

किशनराव बाबा आमलापुरे


प्रा भगवान आमलापुरे
फुलवळ.मो ९६८९०३१३२८
द्वारे. शं गु महाविद्यालय,
धर्मापुरी. ता परळी वै.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *