लोहा ; विनोद महाबळे
लोहा येथील जि .प. बांधकाम उपविभागाचे वरिष्ठ सहाय्यक (पेशकार) गणपत मारोतराव पांदलवाड हे ३४ वर्ष ८ महिने १२ दिवस अशा प्रदिर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले आहेत.पांदलवाड गणपत मारोतराव हे शांत,मितभाषी कर्तव्यदक्ष व शिस्तप्रिय कर्मचारी म्हणून लोहा तालुक्यात प्रसिद्ध होते.गणपत पांदलवाड यांनी नांदेड जि.प. च्या सेवेत दाखल झाल्यानंतर त्यांनी माहूर,कंधार,सोनखेड,कासराळी, नांदेड व लोहा येथे सेवा बजावून सेवानिवृत्त झाले आहेत.
लोहा येथे जवळपास साडेसहा वर्षे त्यांनी वरिष्ठ सहाय्यक म्हणून अतिशय उत्कृष्टपणे कार्य केले.ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांची सरपंच , उपसरपंच,अनेकजणांचे कामे करायचे . लोहा येथे जि.प.बांधकाम विभागात सेवा बजावलेले उपविभागीय अभियंता,शाखा अभियंता ,पत्रकार बंधू आदिने त्यांच्या कार्याचा गौरव केला.निसर्गाच्या नियमानुसार आपल्या ३४ वर्षे ८ महिन्याच्या अशा प्रदिर्घ सेवेनंतर गणपत मारोतराव पांदलवाड हे सेवानिवृत्त झाले. त्यांच्या या सेवानिवृत्ती बदल त्यांना जि.प.बांधकाम उपविभाग लोहाच्या वतीने शानदार कार्यक्रम घेऊन त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी त्यांचा सपत्नीक सत्कार शाल श्रीफळ पुष्पहार व कपडेरूपी भेट देऊन करण्यात आला.यावेळी उपविभागीय अभियंता जाधव वाय.डी., शाखा अभियंता धमगुंडे एस. व्हि., शाखा अभियंता कुंभार आर.डी, शाखा अभियंता शिवाजी राठोड,कराड , अरुण गुद्दे, कौशल्याबाई जाधव,आदी उपस्थित होते.