लोहा/प्रतिनिधी
दै.लोकपत्र चे कार्यकारी संपादक रवींद्र तहकिक यांनी आपल्या लिखाणातून ‘शेंदाड नाऱ्याचा भैताड पोऱ्या’ या मथळ्याखाली लेखणी चालवली असता हे लिखाण अंगाशी झोंबले आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे समर्थकांनी दै. लोकपत्रच्या औरंगाबाद कार्यालयात जाऊन कार्यकारी संपादक रवींद्र तहकिक यांच्यावर भ्याड हल्ला करण्यात आला.या घटनेच्या निषेधार्थ हल्लेखोरांना त्वरित अटक करून पत्रकारांची मुस्कटदाबी करणाऱ्याला पत्रकार संरक्षण कायद्यानुसार शिक्षा करावी.यासाठी शासकीय स्तरावर लक्ष देवून त्वरित अटक करावी. अन्यथा संपूर्ण राज्यभर पत्रकार रस्त्यावर उतरण्याचा ईशारा देवून सदरिल घटनेचा जाहीर निषेध केलेला आहे.
सदरील घटनेच्या जाहीर निषेधाच्या आशयाचे निवेदन लोह्याचे तहसीलदार विठ्ठल परळीकर यांना देण्यात आले.यावेळी लोहा पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष शिवराज पाटील पवार, दै. भास्कर, दै.मराठवाडा साथीचे तालुका प्रतिनिधी जेष्ठ पत्रकार साहेबराव सोनकांबळे, दैनिक समिक्षाचे मोहन पवार, दैनिक सत्यप्रभाचे संजय कहाळेकर,दै. सामनाचे संतोष तोंडारे, दै. विष्णुपुरी एक्सप्रेसचे मारोती चव्हाण, दैनिक गाववालाचे तुकाराम दाढेल,दैनिक साहित्यसम्राटचे शिवराज दाढेल सह यावेळी लोहा तालुक्यातील पत्रकार बांधव उपस्थित होते.