सध्या संपूर्ण जग हे विनाशाच्या काठावर ऊभे आहे,कोरोनाने संपूर्ण विश्वाला आपल्या मृत्यूच्या बाहूत करकचून घेतले असतांना….पर्यावरण आबाधीत राखण्यासाठी मानवाचा केविलवाना प्रयत्न सुरू आहे.वृक्षांची कत्तल करुन त्याठिकाणी सीमेंटचे जंगल ऊभे करणारा मानव आॅक्सीजअभावी मृत्यू पावत आहेत, ही खूप मोठी शोकांतिका आहे.निसर्गावर आपण कीती अन्याय केला आहे,याची प्रचीती या कठीण काळात प्रकर्षाने जाणवत आहे.आताही वेळ गेलेली नाही,त्यासाठी सर्वांनी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपले आद्य कर्तव्य समजून प्रयत्न करायलाच हवेत.जगभरातमध्ये दर तीन सेकंदांनी एखाद्या फुटबॉलच्या मैदानाएवढं जंगल नष्ट होतंय. जगभरातल्या एकूण प्रवाळापैकी ५० टक्के प्रवाळ (Corals) नष्ट झाली असून २०५० पर्यंत ९० टक्के प्रवाळं नष्ट होण्याचा अंदाज आहे.पर्यावरणाची ही हानी रोखत, पुन्हा संतुलन साधण्याचा प्रयत्न, ही यावर्षीची थीम आहे. २०२१पासून पुढचं दशक युनायटेड नेशन्स (संयुक्त राष्ट्रं) परिसंस्थेचं पुनरुज्जीवन करण्यासाठीचं दशक म्हणून साजरं करणार आहे.
संपूर्ण विश्वात ५ जून हा जागतिक पर्यावरण दिन सर्वत्र साजरा केला जातो,पर्यावरणाची गूणवत्ता वाढवणे,समस्या व संवर्धनाविषयी जागरुकता निर्माण करणे आणि पर्यावरण विषयकच निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून पोषक वातावरणाची निर्मिती करणे हा पर्यावरण दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश आहे.मानवाने पर्यावरणाच्या प्रत्येक घटकात हस्तक्षेप करुन स्वता:चा विनाश करुन घेतला आहे.बदलत्या काळात पर्यावरणात वाढत चाललेला कार्बन डाॅयआॅक्साईड सर्वांचेच डोकेदूखी बनत चालला आहे.पण,सध्याच्या कोरोना लाॅकडाऊन मूळे पर्यावरणाला पोषक वातावरण तयार झाले आहे.सध्या उद्योगधंदे बंद पडले आहेत,त्यामूळे ओझोनचा थर सूधारत आहे,बांधकामाची कामे बंद असल्यामूळे हवाही साफ होत आहे.वायूप्रदूषणात बांधकाम देखील महत्वपूर्ण योगदान देतात.या शिवाय वाहनांच्या आवाजामूळे ध्वनीप्रदूषण प्रभावीपणे कमी झाले आहे.
सध्याच्या स्थितीमध्ये पर्यावरणाच्या असंख्य समस्या मानवापूढे उभ्या आहेत.पर्यावरण म्हणजे मानव,वृक्ष,हवा,पाणी आणि त्यांचे परस्पर संबंध.मानवाला जगण्यासाठी शुध्द हवा,स्वच्छ पाणी आणि पोषक अन्नाची गरज असते.पण ते शुध्दच मीळेल याची खात्री नसते.खरे पाहाता पाणी हे मानवी जीवनासाठी अमृत आहे.पण,शहरीकरण,औद्योगिकरण्,कारखाने यामूळे जलप्रदूषणाची समस्या उग्र स्वरुप धारण करीत आहे,जलप्रदूषणामूळे विषम ज्वर,कावीळ,काॅलरा,अतिसार,अमांश,हे रोग मोठ्या प्रमाणात उद्भवतात,भारतामध्ये ६०टक्के रोग हे जलप्रदूषणामूळे पाण्यातून पसरतात.या प्रदूषित पाण्यामध्ये विविध प्रकारची शेवाळी,जलपर्णी या वनस्पती असतात.त्यावर डासांचे प्रमाण वाढते.त्याचप्रमाणे ध्वनी प्रदूषण,जमीन प्रदूषण यावर देखील वेळीच आळा घालणे अत्यंत गरजेचे आहे.आपला भारत देश असा आहे की,ज्या देशाच्या घटनेने पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करणे हे प्रत्येक नागरीकांचे आद्य कर्तव्य आहे.असे स्पष्ट केले आहे.
हवा,पाणी,जमीने हे आपल्याला निसर्गाचे अमुल्य असे दान आहे.त्याचा पूरेपूर फायदा घेणे हा आपला हक्क आहे.तसेच त्याचे रक्षंण करणे हे मानवाच्या पूर्णपणे हातात आहे.आपण जश्या समस्या निर्माण करतो तश्या त्या आपण दूरही करु शकतो.म्हणून आपण सर्व मिळुन प्रतिज्ञा करु या की,आपण पर्यावरणाचे रक्षण करु.पर्यावरणाचे संरक्षण करण्याचे कार्य आपण आपल्या घरापासुनच सूरुवात करुया.प्लॅस्टिकचा वापर टाळून,त्याठिकाणी कापडी पीशवीचा वापर करुया.पाण्याचा,विजेचा गैरवापर टाळूया,घराबाहेर जाताना पंखे,लाईट,फॅन बंद आहेत का हे तपासूनच घराबाहेर पडूया.प्रत्येकाने आपल्या अंगणात एक तरी झाड लावून ते वाढवण्याचा वसा घेऊया. शेतकऱ्यांनी सुध्दा रासायनिक खतांचा वापर टाळून सेंद्रिय खतांचा वापर करावा त्यामुळे जमिनीची नापिकता कमी होऊ पर्यावरणाचा ऱ्हास होण्यास आळा बसेल. अशा प्रकारे सर्वांनी मनावर घेऊन हे कार्य केल्यास नक्कीच पर्यावरणाचे संरक्षण होइल,आणि मानवी जीवन सुखकर होइल.पेराल ते उगवते, या उक्तीप्रमाणे तुम्ही निसर्गाकरिता काही चांगले केले, तर तो तुम्हाला भरभरुन देईल. त्यामुळे आपण त्याचे रक्षण करणे, संवर्धन करणे गरजेचे अत्यंत गरजेचे आहे.
मानवाला या पृथ्वीवरील आपले अस्तित्व जोपासण्यासाठी पर्यावरणाची मौलिकता टिकवून ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.आणि त्यासाठी आतापासून प्रयत्न करायला काय हरकत आहे.चला तर मग,संकल्प करुया…पर्यावरणाचे रक्षण करुया!
रुपाली वागरे/वैद्य
नांदेड
९८६०२७६२४१