नांदेड जिल्हा क्राईम ; तु माझ्या घरून जा असे म्हणल्याचा राग आल्याने आरोपीने मयतास थापडा बुक्याने तोंडावर आणि छातीवर तसेच लाकडी फळीने आणि बांबुने मारुन केला गौळीपुरा नांदेड येथे खून

तु माझ्या घरून जा असे म्हणल्याचा राग आल्याने आरोपीने मयतास थापडा बुक्याने तोंडावर आणि छातीवर तसेच लाकडी फळीने आणि बांबुने मारुन केला गौळीपुरा नांदेड येथे खून

१) खुन :

दिनांक ०४/०६/२०२१

वजीराबाद: दिनांक ०३.०६.२०२१ रोजी चे १४.३५ वा. चे सुमारास, मयताचे राहाते घरी गौळीपुरा नांदेड येथे, यातील मयत नामे साहेबराव नागोराव नवघडे, वय ४८ वर्षे, व्यवसाय खाजगी नौकरी रा. गवळीपुरा नांदेड यांनी आरोपीस तु माझ्या घरून जा असे म्हणल्याचा आरोपीस राग आल्याने आरोपीने मयतास थापडा बुक्याने तोंडावर आणि छातीवर तसेच लाकडी फळीने आणि बांबुने मारुन खून केला. वगैर फिर्यादी मनोज साहेबराव नवघडे, वय २३ वर्षे, व्यवसाय मजुरी रा. गवळीपुरा नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे वजीराबाद गुरनं १६४/२०२१ कलम ३०२ भादवि कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपास पोउपनि/ श्री आमोल पन्हाळकर, मो. क्र. ८४५९२१००३५ हे करीत आहेत.

मुखेड :- दिनांक ०२.०६.२०२१ रोजी चे २३.०० ते दि. ०३.०६.२०२१ चे ०६.०० वा. चे दरम्यान, फिर्यादीचे व साक्षीदार यांचे

२) घरफोडी :

किराणा दुकानात मो. जांब (बु) ता. मुखेड जि. नांदेड येथे, यातील फिर्यादी व साक्षीदार यांचे दुकानाचे कोणीतरी अज्ञात चोरटयांने शटरचे कुलूप तोडुन दुकानात प्रवेश करुन दुकानातील माल व रोख रक्कम १,०२,८०० रुपयाचा व गजानन दळवे यांचे दुकानातील माल व रोख रक्कम असा ५६,०००/- रुपयाचा माल एकुण १,५८,८००/- रुपयाचा माल व नगदी रक्कम चोरुन नेले. वगैरे फिर्यादी शिवराज अनंतराव अमिलकंठवार, वय ४१ वर्षे, व्यवसाय व्यापार रा. जांब (बु.) ता. मुखेड जि. नांदेड यांचे फिर्यादवरुन पोस्टे मुखेड गुरनं १५९/२०२१ कलम ४५७, ३८०, भादंवि कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असुन, तपास पोउपनि/ श्री जी. डी. काळे, मो.क्रं. ९८५००७२०७८ हे करीत आहेत.


३) मो. सा. चोरी :

१) सोनखेड :- दिनांक ०१.०६. २०२१ रोजी चे १०.०० ते दि. ०२.०६.२०२१ चे ०३.३० वा.चे दरम्यान, मौ. जानापुरी ता. लोहा जि. नांदेड येथे, यातील फिर्यादीने आपली हिरो होंडा स्लेंडर प्लस कंपणीची मो सा क्रमांक एमएच-२६/बीटी-५२५७ किंमती रुपयाची घरा समोर उभी करुन झोपले असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली. वगैरे फिर्यादी दत्ता सटवाजी ५०,०००/- लोखंडे, वय ६५ वर्षे, व्यवसाय शेती रा. जानापुरी ता. लोहा जि. नांदेड यांचे फियांदवरुन पोस्टे सोनखेड गुरनं ७४/२०२१ कलम ३७९ भादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपास पोहेकॉ / १९३९ हंबर्डे, मो क्रं ९९५८८६८००२ हे करीत आहेत.

४) शासकीय कामात अडथळा :

१) हिमायतनगर :- दिनांक ०३.०६.२०२१ रोजी चे १८.०० वा. चे सुमारास, मौ. सवना ता. हिमायतनगर जि. नांदेड येथे, यातील नमुद आरोपीने तुम्ही पोलीस आमचे गावात कसे काय आलात तुम्हाला शेती मोजण्याचा अधिकार आहे काय या कारणावरुन अश्लील भाषेत शिवीगाळ करून तुम्हा पोलिसांना कापुन टाकतो असे म्हणुन जिवे मारण्याची धमकी दिली. व पोलीस गाडी समोर येवुन गाडी आडवुन शासकीय कामात अडथळा निर्माण केला. वगैरे फिर्यादी मपोहेकॉ/१८२८ कोमल बालाजी कागणे, ने. पोस्टे हिमायतनगर यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे हिमायतनगर गुरन १२२ / २०२१ कलम ३५३, ३४१, २९४, ५०६, भादवि कायदा रमाणे गुन्हा दाखल असुन तपास पोउपनि/ श्री देवकत्ते, मो.क्र. ८९७५७६९२३२ हे करीत आहेत.


२) कंधार :- दिनांक ०३.०६.२०२१ रोजी चे १६.३० वा. चे सुमारास म. स. बैंक शाखा पेठवडज ता. कंधार जि. नांदेड येथे, यातील फिर्यादी हा मध्यवर्ती सहकारी बैंक शाखा पेठवडज येथे मॅनेजर म्हणुन डयुटीवर असतांना यातील नमुद आरोपीने बँकेत कांही काम नसताना त्याचे चुलता एकनाथ मयेलवाड यांचे नावे अनुदान द्या म्हणून बँकेत आला तेंव्हा फिर्यादीने त्यास कागदपत्र ठेवुन जा प्रोसिजर करावे लागते उद्याला येऊन पैसे घेऊन जा असे म्हणाले असता मला आताच पैसे पाहिजे म्हणुन फिर्यादीला शिवीगाळ करून शर्टचे कॉलर धरून बुक्याने पोटात मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिली. व शासकीय कामात अडथळा निर्माण केला. वगैरे फिर्यादी रमेश पि विठ्ठलराव घोरवाडे, वय ५० वर्षे, व्यवसाय नौकरी म. स. बैंक शाखा पेठवडज, मु. पो. एकंवा ता. औराद जि. बिदर ह. मु. पेठवडज ता. कंधार यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे कंधार गुरन १६०/२०२१ कलम ३५३, ३३२, ५०४, ५०६ भादवि कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपास सपोनि श्री जाधव, मो.क्र. ८९९९८८१९०० हे करीत आहेत.


५) फसवणुक :

मुदखेड :- दिनांक ०३.०६.२०२१ रोजी एक महिन्यापूर्वी वेळ नक्की नाही, फिर्यादीचे शेतात पांढरवाडी रोडजवळ ता. मुदखेड जि. नांदेड येथे, यातील फिर्यादीचे नौकर आरोपी क्रं १, २, ३, यांनी संगणमत करुन फिर्यादीने विश्वासाने सोपवलेल्या त्याचे शेतातोल हाळदीचे पिक अंदाजे ३० क्विंटल किंमती २,१०,०००/-रु ची हळद विकुन फिर्यादीस पैसे आणुन देतो असे खोटे बोलून आलेल्या पैशाचा परस्पर अपहार करुन फसवणुक केली. वगैरे फिर्यादी रामराव पि. लक्ष्मीकांत चौधरी, वय ७५ वर्षे, व्यवसाय शेती रा. चौधरी गल्ली मुदखेड ता. मुदखेड जि. नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे मुदखेड गुरन. १०४/२०२१ कलम ४२०, ४०८, ३४ भादवि कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असून तपास पोउपनि/ श्री पवार, मो.क्र. ९५२७९८३९०७ हे करीत आहेत.


६) अपघात:

देगलुर :- दिनांक ०२.०६.२०२१ रोजी चे १९.३० ते दि. ०३.०६.२०२१ चे ०७.४५ वा. चे दरम्यान, देगलुर ते रामपुर जाणारे रोडवर एकनाथ कांबळे यांचे शाळे जवळ ता. देगलुर जि. नांदेड येथे, यातील मयत नामे मन्याबाई सायन्ना तेलीवार, वय ८५ वर्षे, कळसकर गल्ली ता. देगलुर जि. नांदेड यातील अज्ञात वाहन चालकाने ताब्यातील वाहन हयगई व निष्काळजी पणाणे भरधाव वेगात चालवुन यातील मयतास जोराची धडक देवून त्याचे मरणास कारणीभूत झाला. वगैरे वरुन फिर्यादी हनमल्लु सायना तेलीवार, वय ५९ वर्षे, व्यवसाय आचारी रा. कळसकर गल्ली ता. देगलुर जि. नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे देगलुर गुरन २४६/२०२१ कलम ३०४ (अ), २७९ भादवि कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असून तपास मपोउपनि/ सुर्यवंशी मॅडम, मो.नं. ९५५२५२०३६३ हे करीत आहेत.

२) तामसा :- दिनांक ०२.०६.२०२१ रोजी चे १८.०० वा. चे सुमारास, मौ. टाकराळा पाटी जवळ भोकर ते हिमायतनगर जाणारे रोडवर ता. हिमायतनगर जि. नांदेड येथे, यातील मयत नामे विश्वनाथ आडेलु सुर्यवंशी, वय ५० वर्षे, रा. पारवा (बु.) ता. हिमायतनगर जि. नांदेड हे सायंकाळी १८.०० वा. चे सुमारास भोकर ते हिमायतनगर रोडवर टाकाराळा पाटी चे समोर पायी घराकडे येत असतांना यातील नमुद आरोपीने त्यांचे ताब्यातील ॲपे अॅटो हा हयगय व निष्काळजीपणाणे भरधाव वेगात चालवुन यातील मयतास पाठीमागुन धडक देवुन गंभीर जखमी करुन त्याचे मृत्युस कारणीभुत झाला. वगैरे वरुन फिर्यादी घॉडीबा विश्वनाथ सुर्यवंशी, वय २८ वर्ष, व्यवसाय मजुरी रा. पारवा (बु.) ता. हिमायतनगर जि. नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे तामसा गुरन १०४/२०२१ कलम ३०४ (अ), २७९ भादवि कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असून तपास पोउपनि श्री घुगे, मो.नं. ९४२३६१४६५३ हे करीत आहेत.

७) प्रोव्हिबीशन :

माळाकोळी :- दिनांक ०३.०६.२०२१ रोजी चे १२.३० वा. चे सुमारास, मौ. मुरंबी चौक टि पॉईंट जवळच रस्त्यावर देवला तांडा जाणारे रोडवर ता. लोहा जि. नांदेड येथे, यातील नमुद आरोपीने बिना परवाना बेकायदेशिररित्या गावठी दारु किंमती १५००/- रुपयाची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने ताब्यात बाळगलेला मिळुन आला. वगैरे फिर्यादी पोहेकॉ/१८८८, प्रभाकर बाबाराव क्षीरसागर, ने. पोस्टे माळाकोळी यांचे फिर्यादवरुन पोस्टे माळाकोळी गुरन ९१/२०२१ कलम ६५ (ई), महाराष्ट्र प्रो कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपास पोहेकॉ/९५४ कल्लेवार, मो.क्र. ८८८८८३२०४७ हे करीत आहेत.

——————————— सौजन्य**

जनसंपर्क अधिकारी

पोलीस अधिक्षक कार्यालय, नांदेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *