पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकांनी एक झाड लावून जोपासना करणे गरजेचे …;जल है तो कल है : सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे

लोहा( प्रतिनिधी)
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त काल शनिवार दिनांक 5 जून रोजी तालुक्यातील वागदरवाडी येथे भिवराई फाउंडेशन च्या वतीने” पर्यावरण कीर्तन” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी पर्यावरण कीर्तन कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शामसुंदर शिंदे उपस्थित होत्या, यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जि. प. सदस्य चंद्रसेन पाटील, सामाजिक कार्यकर्ते बाबूराव केंद्रे, लोहा खरेदी-विक्री संघाचे उपसभापती श्याम अण्णा पवार, ह-भ-प नागनाथराव तिडके महाराज ,ह. भ. प .बालाजी केंद्रे महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी उपस्थित गावकऱ्यांशी पर्यावरण कीर्तन कार्यक्रमात संवाद साधतांना सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे म्हणाल्या की कोरोनाच्या महाभयंकर संकटात ऑक्सिजनचे महत्त्व लोकांना कळाले आहे व शुद्ध ऑक्सिजनची मोठी गरज असल्याचे लोकांच्या लक्षात येत असून सर्व नागरिकांनी सामाजिक बांधिलकी जपत प्रत्येकाने आपल्या घरासमोर एक झाड लावून त्या झाडांची जोपासना करण्याची काळाची गरज असल्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे यांनी केले. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडांची मोठ्या प्रमाणात उपलब्धता असणे गरजेचे असून चांगल्या प्रमाणात पाऊस पडण्यासाठी झाडांचे महत्त्व लाख मोलाचे आहे,जमिनीतील पाणीसाठ्यात वाढ होण्यासाठी व नागरिकांना शुद्ध ऑक्सिजन मिळण्यासाठी झाडांचे कार्य मोलाचे असून “जल है तो कल है” या उक्तीप्रमाणे जमिनीत मुबलक पाणी साठा कायम राहण्यासाठी व वातावरणात शुद्ध ऑक्सिजन नागरिकांना मिळण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरासमोर एक तरी झाड लावून त्या झाडांची जोपासना करावी असे नम्र आवाहन पर्यावरण कीर्तन कार्यक्रमात उपस्थितांशी बोलताना सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे यांनी केले,,

यावेळी या कार्यक्रमास भिवराई फौंडेशनच्या अध्यक्षा स्वाती केंद्रे,सरपंच वर्षा केंद्रे, शेकापचे युवक जिल्हाध्यक्ष योगेश पाटील नंदनवनकर, सिद्धू पा. वडजे, शेषराव पाटील, प्रसाद जाधव, रावसाहेब केंद्रे, शंकर गुट्टे , निळकंठ तिडके, चंद्रकांत केंद्रे, गणपत केंद्रे , वन विभागाचे अधिकारी,कर्मचारी व भिवराई फाउंडेशन चे सर्व पदाधिकारी, गावकरी सामाजिक अंतराचे पालन करत उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *