उमरखेड: (डी. के. दामोदर )
वंचित बहुजन आघाडी शाखा उमरखेड च्या वतीने सार्वजनिक वाहतूक सेवा पूर्ववत कराव्यात आदी सह विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडणीस यांना देण्यात आले. कोरोणाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेले छोटे-मोठे व्यवसाय सुरू करण्यासाठी डफली बजाओ आंदोलन करण्यात आले.
छोटे दुकान, ऑटोरिक्षा छोटे व्यापारी फुटपाथ वरचे विक्रेते इत्यादीनसाठी वेळेचे कुठलेही बंधन न ठेवता लॉकडॉउन पुर्णता उठवावे.या प्रमुख मागणी सह अॅड, बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वय दि.१२/०८/२०२० रोज बुधवारला प्रत्येक तालुक्यात बसस्टॅड समोर “डफली बजाओ आंदोलन” महाराष्ट्र भर करण्याचे ठरविले होते. त्यामुळे उमरखेड वंचित बहुजन आघाडीच्या वतीने, उमरखेड बसस्टॅड गेट समोर आज संकाळी.१२.३०वा सर्वानी वेळ वर हजर राहून एकाआगळ्या वेगळ्या “डफली बजाओ आंदोलन” ला सहभाग नोंदविला व यशस्वी केले.एस.डी.ओ. उमरखेड यांना निवेदन सादर करून आदोलनाची सांगता करण्यात आली. या आंदोलनला भीम टायगर सेना या सामाजिक संघटनेने जाहीर पाठिंबा दर्शविला होता. यावेळी डि.के. दामोदर, अॅड. शंकरराव मुनेश्वर, भारत कांबळे, संबोधी गायकवाड, जाॅन्टी इनकरे, आनंदा वाहुळे, संतोष जोगदंड, विलास धुळे, साहेबराव खडसे, राजु खंदारे, सिद्धार्थ दिवेकर, कुमार केंद्रेकर, कैलास कदम, संदीप विणकरे, अर्जुन बरडे, पंडित मेंजर, निकेश गाडगे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.