21 जुन जागतिक योगदिन ; शब्दबिंब


कंधार ; प्रतिनिधी


भारतातील योग- प्राणायाम अन् आयुर्वेद ही जगाला दिलेली देणगी होय!प्राचीन काळात ऋषिमुनींनी या योग साधनेतून आपली तपश्चर्या वर्षानुवर्ष करत,आपली तपश्चर्या पुर्ण केली.२५६५ वर्षापुर्वी तथागत भगवान गौतम बुद्ध या महान अहिंसेचे पुजक, विश्वाला शांतीचा संदेश देणारे यांनी बोधीवृक्षाखाली ज्ञानाची साधना करतांना योगाभ्यास करून ज्ञान संपादन केले .अलीकडील काळात पतंजली योग समितीच्या माध्यमातून सातासमुद्रापार योग-प्राणायाम व आयुर्वेदाचा प्रचार व प्रसार केला.त्यांना आचार्य बाळकृष्ण यांची तोलामोलाची साथ लाभली.भारताचे महामहिम पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजींनी पंतप्रधान पदी विराजमान होताच २०१४ या वर्षी संयुक्त राष्ट्रसंघाच्या परिषदेत मार्गदर्शन करतांना योगदिनाचे महत्व विशद करुन जागतिक स्तरावर योगदिन २१ जुन रोजी साजरा व्हावा ही मनिषा व्यक्त केली.


आज बरोबर सात वर्षापुर्वी म्हणजे २०१५ या वर्षी पहाला जागतिक योगदिन आरंभ झाला पाहता-पाहता सातवा योगदिन साजरा होतो आहेेेेे.तसेच मन्याड खोर्‍यात योग-प्राणायामचा प्रसार करुन ऑफलाईन योग शिबीरे गावोगाव घेवूूून जनता-जनार्दनांचे
आरोग्य सांभाळून या कोरोना काळात ऑनलाईन योग शिबीर आयोजित करुन अनेकांचे आरोग्य सांभाळले.
या जागतिक योगदिनाच्या औचित्यानेच


गोपाळसुत
दत्तात्रय एमेकर गुरुजी
क्रांतिभुवन बहाद्दरपुरा
यांनी शब्दबिंबातून योग-प्राणायाम व आयुर्वेद यांचे संक्षिप्त स्वरुप तुम्हा सर्वांच्या पुढे..
सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *