नांदेड – ज्येष्ठ पौर्णिमेनिमित्त शहरातील देगावचाळ येथील प्रज्ञा करुणा विहारात २४ जून रोजी सायंकाळी सात वाजता व्याख्यान व सप्तरंगी साहित्य मंडळाच्या काव्यपौर्णिमा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर बौद्ध उपासक उपासिकांना खीरदान करण्यात येणार असल्याची माहिती संयोजक सुभाष लोखंडे यांनी दिली. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत सावळे, सेवानिवृत्त उपायुक्त महानगरपालीका प्रकाश येवले, साहित्यिक अनुरत्न वाघमारे, गंगाधर ढवळे, रिपाइं जिल्हा उपाध्यक्ष दीपक सातोरे, राहुल कोकरे यांची उपस्थिती राहणार आहे.
येथील सप्तरंगी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी ४२ वी काव्यपौर्णिमा देगाव चाळ येथील बुद्ध विहारात संपन्न होणार असून त्यात राज्याध्यक्ष अनुरत्न वाघमारे, उपाध्यक्ष नागोराव डोंगरे, महासचिव पांडूरंग कोकुलवार, सहसचिव कैलास धुतराज, कोषाध्यक्ष गंगाधर ढवळे , कार्याध्यक्ष मारोती कदम, शंकर गच्चे, राज्य समन्वयक प्रशांत गवळे, राज्य संघटक बाबुराव पाईकराव, महिला विभाग प्रमुख रुपाली वैद्य वागरे, जिल्हाध्यक्ष रणजीत गोणारकर, महानगर प्रभारी भैय्यासाहेब गोडबोले यांच्यासह अनेक नवोदित कवी कवयित्री सहभागी होणार आहेत.
बौद्ध धम्मात पौर्णिमेचे महत्व या विषयावर बौद्ध वाङमयाचे अभ्यासक राहूल कोकरे मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर सेवा निवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत सावळे यांच्या वतीने खिरदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहणा्याचे आवाहन रमामाता महिला मंडळाच्या गयाबाई हाटकर, भिमाबाई हाटकर, निर्मलाबाई पंडीत, शोभाबाई गोडबोले, चौतराबाई चिंतोरे, सविताताई नांदेडकर, रंजनाबाई वाळवंटे, सुमनबाई वाघमारे, पद्मीनबाई गोडबोले, निलाबाई हाटकर, लक्ष्मीबाई खाडे, गोदावरीबाई लांडगे, आशाबाई हाटकर,, गिताबाई दिपके, रमाबाई सातोरे, शिल्पाताई लोखंडे यांच्यासह महिला मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.