कंधार ; प्रतिनिधी
भाजपा नांदेड महानगर, अमरनाथ यात्री संघ, लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रल यांच्या तर्फे धर्मभूषण अॅड. दिलीप ठाकूर यांनी आयोजीत केलेल्या १९ व्या चालण्याच्या भव्य स्पर्धेचे उद्घाटन खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आले असून १० विविध गटातील १५७ स्पर्धकांनी सहभाग घेतल्या मुळे स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला.
गोवर्धनघाट येथील श्रीराम सेतु पुलावर दोन किमी अंतराच्या चालण्याच्या स्पर्धेचा उद्घाटन प्रसंगी बोलतांना खा. चिखलीकर यांनी दिलीप ठाकूर यांच्या सातत्याचे कौतुक करून वर्षभरात 365 कार्यक्रम जरी घेण्यास सांगितले तरीदेखील दिलीपभाऊंचा उत्साह कमी पडणार नाही असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणारे भाजपा जिल्हाध्यक्ष प्रवीण साले यांनी अशा स्पर्धा दिलीप ठाकूर हे दरवर्षी आयोजित करत असल्यामुळे नांदेडकरांना चालण्याची सवय लागत असल्याचे आवर्जून सांगितले.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ॲड. सी.बी.दागडिया, राम तुप्तेवार, द्वारकादास माहेश्वरी, डॉ. दीपकसिंह हजारी, बागड्या यादव, अनिलसिंह हजारी, प्राचार्य दुर्गादेवी कच्छवे, श्याम भक्कड सुनील गट्टानी, एम.के.राव हे उपस्थित होते. स्पर्धेचे मुख्य प्रायोजक बालासाहेब कच्छवे आणि विजयसिंह परदेशी यांनी उपस्थितांचे स्वागत केले.नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती व्हावी आणि 2 जुलैला अमरनाथला जाणार्या यात्रेकरूंची प्रकृती उत्तम रहावी यासाठी चालण्याची स्पर्धा आयोजीत करण्यात आल्याची माहिती संयोजक दिलीप ठाकूर यांनी आपल्या प्रास्ताविकातून दिली. वेगवेगळया 10 गटामध्ये झालेल्या स्पर्धेत श्रीराम मोटरगे, डॉ. नंदिनी चौधरी,नरेंद्र ठाकूर,यादव मालभडगे,दुर्गेश ठाकूर, नंदिता दोमकोंडेकर, सारिका कोत्तावार, दत्तात्रेय बारसे, सुनील साबू, सुभाष देवकते यांनी प्रथम पारितोषिक पटकावल्यामुळे विजेत्यांना खा. चिखलीकर व प्रवीण साले यांच्या हस्ते कच्छवेज गुरुकुल तर्फे ठेवण्यात आलेले मोबाईल देण्यात आले.
चुरशीच्या लढतीत प्रा. गणेश शिंदे, अनिल सहारे,विलास डांगे, योगेश मालपाणी ,नागेश्वर क्षीरसागर, वैशाली बामनकर, संगीता बागडे,महेमुदा खान, शिवाजी मोरे,ओमकार बंगरवार यांनी आपआपल्या गटात दुसरे बक्षिस मिळविले. शिवाजी शिंदे, सुनिता परकंठे, दिगम्बर भोसले, ,बालाजी निलपत्रेवार, शंकर मूलंगे, ऋतुपर्ण खडकीकर, आकांक्षा कटकमवार, डॉ. निर्मला कोरे, सुनील साबू, शंकर परकंठे यांना तिसर्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. सर्व विजेत्यांना मंगल कार्यालय व टेंट हाऊस असोशिएशनचे जिल्हाध्यक्ष विजयसिंह परदेशी यांच्या तर्फे आकर्षक स्मृतिचिन्ह देण्यात आले. स्पर्धेचे पंच म्हणून अरुणकुमार काबरा, सुरेश शर्मा, प्रशांत पळसकर व कामाजी सरोदे यांनी अतिशय चोख बजावले. भाजपा जिल्हा प्रसिद्धीप्रमुख धीरज स्वामी व दिलीप ठाकूर यांनी स्पर्धेचे ओघवत्या शैलीत धावते वर्णन केले. याप्रसंगी लॉयन्सच्या डब्याचे अन्नदाते, मायेची उबचे ब्लॅंकेट दाते, आणि कृपाछत्र मधील छत्री देणाऱ्या दानशूर नागरिकांचा शाल व मोत्याची माळ देऊन सन्मान करण्यात आला.स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आदित्य कच्छवे, कमलाकर काळे अमोल कुलथिया, सुरेश निलावार,रुपेश व्यास,संतोष भारती, राजेश यादव,राहुल बनसोडे,धरमसिंग परदेशी यांनी परिश्रम घेतले.21 जुन रोजी सकाळी 7 वाजता अॅड. दागडीया यांच्या प्रांगणात जागतिक योग दिन साजरा करण्यात येणार असून एक तासाच्या प्रशिक्षणात सहभागी झालेल्या सर्वांना सैनीटायझर व मास्क मोफत वितरीत करण्यात येणार असल्याची माहिती संयोजक अॅड. दिलीप ठाकूर यांनी दिली आहे.
( छाया: करणसिंह बैस, व्यंकटेश वाकोडीकर)