फमु——————-
फमुं हे कोणा रुपूरच्या शिंद्याचं नाव नसतं
ते हिरव्या गप्पांचं नितांत सुंदर गाव असतं
हे गाव माणसांच्या मैफलीत असतं
तेव्हा
मैफलही विलक्षण झुलत असते
खट्याळ म्हातारीनं म्हाता-याची
खोड काढावी तशी
आतून अंगभर खुलत असते
खोड्या तशा तुम्ही-आम्ही,ते-त्या
सगळेच जण काढत असतात
लाजाळूच्या भिंती हळूहळू
पाडत असतात
फकिराच्या वस्तीला चोराचिलटाचं
भय नसतं..
फमुं म्हणजे पाषाणाची गिर्रेबाज
विहीर आह
एका बगारीला हास्य तर
दुसरीकडे कारुण्याची
कपार आहे
कोणता झरा कुठून येतो
कळत नाही
खारट पाण्याला गोड पाणी
छळत नाही
पाणी हे पाणी असतं
गोड गळ्याच्या आईचं
जात्यावरचं
गाणं असतं..
कोट्या करण्यात किंचितही
खोट नाही
बंद पडलेली हजार पाचशेची
नोट नाही
चिमटेबाज उत्तर पण
अत्र्यांसारखं थेट नाही
त्याच पठडीतलं घर;
पण कुत्र्यापासून सावधान
म्हणणारं
गेट नाही!
चकाकणारं म्हणतात लोक
सगळंच काही
सोनं नसतं..
– डॉ. जगदीश कदम,
नांदेड.Attachments area