नांदेड- गंगाधर ढवळे
सहकारी पतपेढी शिक्षण विभाग मर्यादित जिल्हा परिषद नांदेड चे विद्यमान चेअरमन तथा म. रा. प्रा. शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष तथा शिवा कर्मचारी महासंघाचे उपजिल्हाप्रमुख शिक्षक नेते निळकंठ चोंडे यांचा 56 वा वाढदिवस करोना प्रादुर्भावामुळे कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम न करता सुमन अनाथालयात covid-19 तपासणीसाठी ची थर्मलगन व खाऊचे वाटप करण्यात आले.
यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक संघाचे राज्य नेते जीवनराव वडजे प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष तथा सहकारी पतपेढीचे सचिव मधुकर उन्हाळे, शिवा कर्मचारी महासंघाचे राज्य सरचिटणीस विठ्ठल ताकबीडे, सुमन अनाथालयांचे संचालक अनिल दिनकर, शिक्षक परिषदेचे मराठवाडा अध्यक्ष तथा सहकारी पतपेढीचे संचालक संजय कोठाळे, परिषदेचे जिल्हाध्यक्ष तथा सहकारी पतपेढीचे संचालक डीएम पांडागळे, कार्यवाह दिगंबर पाटील कुरे, जिल्हा कोषाध्यक्ष बालाजी पांपटवार, जिल्हाध्यक्ष एल बी चव्हाण, सुशील जैन हे उपस्थित होते.
या प्रसंगी सुमन अनाथालयातील सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून सेनिटायझर व थर्मल गन वाटप करण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात शिक्षक सेनेचे रवी बंडेवार संघाचे रमेश घुमलवाड शिवा संघटनेचे प्रसिद्धीप्रमुख प्राध्यापक रामकिशन पालीमकर, कुमारी इंजिनियर विद्या चोंडे, इंजिनीयर वैभव चोंडे आदी उपस्थित होते. तसेच सहकारी पतपेढी नांदेड येथे ही नीळकंठ चोंडे यांच्या वाढदिवस वाढदिवस सोशल डिस्टन्स ठेवून साजरा करण्यात आला. जि.प. के.प्रा.शा निळा येथे सहकाऱ्यांच्या वतीने विद्यार्थ्यांना सॅनिटाईझर व खाऊचे वाटप करण्यात आले यावेळी पतसंस्थेचे अधीक्षक प्रवीण देवापुरे, खजिनदार बी एम चेमेलें, सहशिक्षक कैलास पोहरे, संजय बेळगे, सुलभा पाण्डे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस साजरा करण्याची परंपरा कायम ठेवण्यात आली आहे.