किनवट येथेही आजचे डफली बजाव‌ आंदोलन यशस्वी

किनवट येथेही आजचे डफली बजाव‌ आंदोलन यशस्वी


किनवट (सम्राट कावळे)- 

\ तालुका वंचित बहुजन आघाडच्या वतीने  तालुकाध्यक्ष राजेंद्र दादा शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली येथील किनवट आगार बसस्थानकात डफली बजाव‌ आंदोलन करण्यात आले.‌ या आंदोलनामध्ये कार्यकर्त्यांनी स्वेच्छेने सहभाग नोंदवल्यामुळे  हे आंदोलन यशस्वी झाल्याची माहिती सम्राट कावळे यांनी दिली.              कोरोना महामारीच्या निमित्ताने सतत चार महिन्यापासून सरकारने टाळेबंदी केली असून या टाळेबंदीमुळे हजारो-लाखो मोलमजुरी करून पोट भरणाऱ्या व हातावर पोट असणाऱ्या जनतेचे हाल होत असून तसेच एसटी बस कर्मचाऱ्यांचे वेतन बंदीअभावी मिळत नसल्याने त्यांची उपासमार चालू आहे.‌ गेल्या चार महिन्यापासून बस सेवा बंद करण्यात आली. याच्यामुळे रोज मोलमजुरी करण्यासाठी ये-जा करणाऱ्या मजुर वर्गाची हेळसांड होत आहे. या अनुषंगाने किनवट आगार तालुका किनवट जिल्हा नांदेड येथे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष  बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार डफली बजाओ आंदोलन करण्यात आले. 
            हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष राजेंद्र दादा शेळके यांच्यासह जिल्हा उपाध्यक्ष सुरेश जाधव, तालुका महासचिव दीपक दादा ओंकार,  ज्येष्ठ कार्यकर्ते शंकर नगराळे, दयानंद काळे, मिलिंद वाठोरे, अक्रम खान, राहुल कापसे, राजू नरवाडे, सम्राट कावळे अक्षय कावळे, दया पाटील, सुबोध कापसे, राजेश पाटील, विशाल नवरंगे, मिलिंद भालेराव, बाळू कवडे, आशीष कांबळे संदेश चौधरी व इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सक्रीय सहभाग नोंदविला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *