नांदेड ;प्रतिनिधी
नांदेड येथे आशा वर्कर, गट प्रवर्तकाना शासकीय सेवेत कायम करावे अशा अनेक मागण्यांसाठी आज दि.२३ जुन रोजी थाळीनाद आंदोलन करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या समोर करण्यात आलेल्या या आंदोलनात हजारो आशा कर्मचारी सहभागी झाल्या.यावेळी भाजपा महीला मोर्चा प्रदेशउपाध्यक्षा तथा जि.प.सदस्या सौ.प्रणिताताई देवरे चिखलीकर यांनी पाठींबा दर्शवत आवाज उठवण्याचे आश्वासन दिले.
आशा कर्मचारी यांना किमान 18000 रुपये मासिक वेतन द्यावे व गट प्रवर्तक ला 22,000 वेतन ,विमा कवच व अश्या इतर मागण्या कर्मचाऱ्यांच्या आहेत. आजच्या या आंदोलनास अंगणवाडी फेडरेशन, यांना पाठिंबा देऊन आंदोलनात सहभाग नोंदवला. आजच्या या आंदोलनामुळे जिल्हा परिषदेचा परिसर दणाणून गेला होता.
नांदेडचे खासदार यांच्या मार्गदर्शनाखाली आशा वर्कर चे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहे ,तसेच आजच्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण बैठकीत आशा वर्कर च्या मागण्या संदर्भात आवाज उठवणार असे आश्वासन जि.प.सदस्या सौ.प्रणिताताई देवरे चिखलीकर यांनी दिले.