दि.२४ जुन २०२१ रोजी ज्येष्ठ मासी म्हणजे वट सावित्री पौर्णिमा हा सौभाग्यवती नारीशक्ती वटवृक्षाच्या झाडाला दोऱ्याने सुतकत फेऱ्या मारल्याने पती-पत्नीचे नाते सातजन्म राहते,अशी अख्यायीका भारतीय समाजात रुढ आहे.कुणी झाडाला तर शहरात वडाची फांदी तोडून आणुन त्यास सुतकून फेऱ्या मारल्याने आपापलाच पतिश्वर सातजन्मी मिळतो.
म्हणून वटसावित्री पौर्णिमा नारीशक्ती साजरी करते.आज पर्यंत एक ही उदाहरण सातजन्म पती-पत्नी म्हणून राहिले असे सापडत नाहीच! पण… ज्या नारीशक्तीस समाजाच्या जखडात डांबून ठेवून नारीने शिक्षण घेणे निषेध मानणाऱ्या समाजाचा विचार नकरता पुणे या महाराष्ट्राच्या संस्कृतिक राजधानीत पतिश्वर ज्योतिराव फुले यांच्या अध्यापणात अध्ययन करुन नारीशक्तीस शिक्षण देतांना स्वतः अपमानास्पद वागणूक झेलून नारीस शिक्षण दिले.त्याचे फलित म्हणजे नारी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सध्याच्या संगणकीय युगात जीवन जगते आहे.पण त्या वड वृक्षराजाच्या बुंध्यावर सावित्रीबाई फुले यांचे छायाचित्र लावण्याची तसदी किती महिला घेतात?ज्याच्या अथक परिश्रमातून व अपमानास्पद वागणूक झेलून महिलासाठी चंदनासम झिजलेल्या व्यक्तीमत्वाचा विसर का पडला?विद्यार्थी दशेत मुली सावित्रीबाई फुले यांना मानतात.पण नोकरी किंवा लग्न होताच ही नारीशक्ती ज्ञानमाता सावित्रीबाई फुले यांना विसरुन जाते.पण…त्या वटवृक्षास फेऱ्या मारण्यापेक्षा जर प्राणवायु देणाऱ्या वटवृक्षाचे वृक्षारोपण करून सातजन्म वसुंधरेचे पर्यावरण स्वच्छ ठेवून प्रदुषणाचा गळा घोटणे कधी ही चांगले.सुरुवात करावी कोण?या विवंचनेत नारीशक्ती असते.
गोपाळसुत दत्तात्रय एमेकर गुरुजी यांनी कंधारी आग्याबोंड या सदरात आजचे काव्यात्मक आग्याबोंड फक्त माझ्या सहित आपल्या सर्वांसाठी!
प्रत्येक नारीने एक वटवृक्ष लावून,
प्रदुषणाचा गळा घोटणे कधीही चांगले!
प्राणवायुच्या वृक्षाचे संवर्धन केल्याने,
सातजन्म पुरणारे स्वच्छ पर्यावरण,
वडाच्या झाडापासून नक्कीच मिळेल!
गोपाळसुत
दत्तात्रय एमेकर