यशश्री हॉस्पिटलचे डॉ.विवेक शेटे व त्यांचा अंगरक्षक शाहरुख शेख यांच्यावर अमोल हंबर्डे मारहाण प्रकरणी वजीराबाद पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल

नांदेड प्रतिनिधी : अण्णाभाऊ साठे चौक येथे असलेले यसश्री हॉस्पिटलचे डॉ.विवेक शेटे व त्यांचा अंगरक्षक शाहरुख शेख यांनी अमोल देवराव हंबर्डे या युवकास हॉस्पिटलमध्ये गेले असतात त्यांना बोलावून शिवीगाळ करत खोलीमध्ये डांबून मारहाण करण्यात आली पण गेल्या एक महिन्यापासून अमोल हंबर्डे यांनी वजिराबाद पोलीस स्टेशनमध्ये अनेक वेळा चकरा मारूनही गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत असल्यामुळे अमोल हंबर्डे यांनी डॉ.विवेक शेटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांनी सकल मराठा समाजातील सर्व पदाधिकाऱ्यांना झालेल्या अन्यायाची हकीकत सांगितली.

यात निरास झालेल्या अमोल हंबर्डे यांनी सर्व समाजातील पदाधिकाऱ्यांना व सकल मराठा समाजाचे पदाधिकारी यांनी पोलिस अधीक्षक व वजिराबाद पोलिस स्टेशन येथे गेल्यानंतर अमोल हंबर्डे यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही पोलिस स्टेशन येथून जाणार नाही असा पवित्रा घेतल्यानंतर वजिराबाद पोलिस स्टेशनचे पीआय श्री भंडरवार यांनी दिनांक २२.०६.२०२१ रोजी ७.३५ मिनिटाला अमोल हंबर्डे यास हॉस्पिटलच्या एका खोलीमध्ये बंद करून मारहाण शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली होती त्यामुळे पोलीस स्टेशन वजीराबाद सी आर नंबर १९१/२०२१ कलम ३४२,३२३,५०४,५०६,३४,भा.द.वि. प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे सदरील पुढील तपास पोलिस निरीक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक जाधव साहेब हे करत आहेत.


सदरील गुन्हा दाखल न होण्याकरिता डॉ.विवेक सेटे यांनी खूप प्रयत्न केले व प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला त्यामुळे या प्रकरणात डॉ.विवेक शेटे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यास वजीराबाद पोलीस स्टेशन हे टाळाटाळ करत होते त्यामुळे या प्रकरणात आपल्याला न्याय मिळणार नाही त्यामुळे आमोल हंबर्डे यांनी स्वतः विष घेऊन आपले जीवन संपवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे सदरील ही घटना सकल मराठा समाजातील अनेक कार्यकर्त्या पर्यंत पोहोचली मराठा समाजातील युवकांना न्याय देण्यासाठी सर्व सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी वजिराबाद पोलिस स्टेशन येथे डॉ.विवेक शेटे यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा या ठिकाणाहून आम्ही परत जाणार नाही आणि गेल्यानंतर याचे परिणाम वेगळे होतील असा सज्जड इशारा देतादेताच यशश्री हॉस्पिटलचे गुंड वृत्तीचे डॉ.विवेक शेटे यांच्यावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला त्यामुळे एका गरीब मराठा समाजाच्या मुलास सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन न्याय मिळवून दिला त्याबद्दल सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांचे अमोल हंबर्डे यांनी आभार व्यक्त करत त्याच्या डोळ्यात अश्रू आले त्यामुळे सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांचे त्यांनी ऋण व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *