नांदेड :- येथील शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने योग दिन शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या मैदानावर साजरा करण्यात आाला. यावेळी संस्थेचे प्राचार्य एम. एस. बिरादार, उपप्राचार्य एस. एस. परघणे, प्रबंधक राठोड तसेच मार्गदर्शक योगगुरु तथा माजी गट निदेशक आर. डी. केंद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.
योगगुरु केंद्रे यांनी विविध आसनाच्या माध्यमातून योग, आसन, सुर्यनमस्कार, प्राणायाम कसे करावे याचे पुर्ण मार्गदर्शन करुन प्रात्यक्षिकासह सुर्यनमस्कार, ताडासन, नौकासन, वज्रासन, पद्मासन, उतान पादासन, कपालभाती, शितली प्राणायाम तसेच यौगिक सूक्ष्म क्रिया इत्यादी योगासने करुन घेतली. या शिबिराचा लाभ संस्थेतील शिल्प निदेशक, बेसिक कॉस्मेटोलॉजी या व्यवसायाच्या प्रशिक्षणार्थ्यांनी घेतला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकरी एम. जी. कलंबरकर, संजीवनी जाधव, संघटनेचे अध्यक्ष एन. एस. सोलेवाड, संजय आन्नेवार, गटनिदेशक मोतेवार, बर्गे, भारती, केदार, बिहाउत, मांजरमकर, शिंदे, गिरी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक नेहा नोमुलवार, इम्रान शेख, महेश पांचाळ, कैलाश जेठेवाड, अजय तांबोळी, सचिदानंद शिंदे, निखील थोरात यांचे सहकार्य मिळाले.