शासनाच्या अर्थसहायाचा लाभ घेण्यासाठी घरेलू कामगारांनी वैयक्तीक माहिती अद्ययावत करावी

नांदेड 23 :- घरेलू कामगारांची नोव्हेंबर ते 31 मार्च 2021 या कालावधीत नोंदीत झालेली वैयक्तीक माहिती अद्यावत करण्याबाबत सूचना आहेत. महाराष्ट्र घरेलु कामगार कल्याण मंडळाकडे नोंदीत कामगारांना कोविड-19 प्रादुर्भाव काळात आर्थिक मदत करण्याच्यादृष्टीने शासनाने प्रत्येकी 1 हजार 500 रुपये अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली आहे.

सन 2011 ते 2014 पर्यंत नोंदीत घरेलु कामगारांची माहिती ऑनलाईन संकलित केली नाही. तसेच 2015 ते 2021 या कालावधीत बऱ्याच नोंदीत घरेलु कामगाराचे बँक तपशील उपलब्ध नाही. या कालावधीतील सर्व नोंदीत घरेलू कामगारांनी त्यांची वैयक्तीक माहिती तसेच बँक खात्याचा तपशील अद्यावत करण्यासाठी http://public.mlwb.inpublic या लिंकचा वापर करावा अथवा सहाय्यक कामगार आयुक्त नांदेड, उद्योग भवन, तळ मजला, औद्योगिक वसाहत, शिवाजीनगर नांदेड या कार्यालयाशी संपर्क करावा साधावा, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त नांदेड यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *