आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते बोधडी वनपरिक्षेत्रा अंतर्गत वृक्ष लागवडीचा शुभारंभ

किनवट ; प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाच्या 33 कोटी वृक्ष लागवडीच्या संकल्पनेतून महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण तसेच नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपीन इटणकर व नांदेड वन विभागाचे उपवनसंरक्षक सातेलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड वन विभागाच्या बोधडी खुर्द येथे मियावाकी वृक्ष लागवडीचा नुकताच शुभारंभ किनवटचे आमदार भीमराव केराम व उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार नाईक व सहाय्यक वनसंरक्षक माजीद रज्जाक शेख यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला.

वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र अभियान सन 2021 अंतर्गत बोधडी वनपरिक्षेत्रा मधील मौजे बोधडी खुर्द येथे राखीव वनामध्ये मियावाकी पद्धतीने रोप लागवडीचा कार्यक्रम संपन्न झाला असता यावेळी कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून किनवट माहूर विधानसभेचे आमदार भीमराव केराम उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार नाईक वन विभागाचे उपवनसंरक्षक एम आर शेख, किनवटचे वनपरिक्षेत्र अधिकारी खंदारे, किनवट नगर परिषदेचे माजी अध्यक्ष अनिल पवार, जिल्हा परिषदेचे बांधकाम अभियंता रमेश बदेवार व बोधडी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र अभियान सन 2021अंतर्गत मियावाकी वृक्ष लागवडी दरम्यान वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीकांत जाधव यांनी अनेक झाडाचे महत्त्व पटवून दिले त्याच बरोबर या वृक्ष लागवडीमुळे रोजगार निर्मिती तसेच जंगलातील पशु पक्ष्यांना खाद्य आणि महत्त्वाचे म्हणजे मानवी जीवनाला लागणारे ऑक्सिजन या वृक्ष लागवडीमधून मिळते असे त्यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *