नांदेड- ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल वाडी बुद्रुक नांदेड येथील शाळेमध्ये अंतरराष्ट्रीय योगा दिन 21 जुन उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेच्या प्रांगणात आंतरराष्ट्रीय योगा दिनाचे आयोजन करण्यात आले.
त्याप्रसंगी योगाचार्य डॉ.धनंजय इंचेकर, प्रमुख मार्गदर्शिका प्रा.डॉ. सीमा सबनीस मॅडम उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी त्यांचे रोपटे देऊन स्वागत केले. त्यानंतर प्राध्यापिका डॉक्टर सीमा सबनीस मॅडम यांनी योगा विषयी सखोल असे मार्गदर्शन केले. भारतीय संस्कृतीने योगा ही जगाला दिलेली अमूल्य देण आहे. योगा अभ्यासामुळे मानवी जीवनाचे संतुलित मन व शरीर असेल तर उत्कृष्ट समाज घडेल असे त्या म्हणाल्या.
योगाचार्यानीं मानवी जीवनामध्ये योगांचे महत्त्व पटवून दिले. या वेळी केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या प्रोटोकॉल प्रमाणे शाळेतील शिक्षकांकडून योगासने करून घेतली. हा सर्व कार्यक्रम शाळेच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन दाखवण्यात आला.
त्यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका, प्राथमिक मुख्याध्यापक श्री अरुण शिंदे, सर क्रीडाशिक्षक कपिल सोनकांबळे प्रवीण कामठेकर,शिवाजी सुकासे संतोष ध्याडे,राष्ट्रपाल नरवाडे, अतिश थोरात,पर्यवेक्षक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सुद्धा उस्फूर्तपणे सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्काऊंटर एकनाथ कार्लेकर यांनी केले. तर आभार अश्विनी येतेजवार यांनी व्यक्त केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.