कंधार /प्रतिनिधी
केंद्रातील भाजपा सरकारने पेट्रोल-डिझेल आणि घरगुती गॅसच्या किंमती प्रचंड वाढविलेल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाल्यामुळे या भाववाढीच्या निषेधार्थ कंधार तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तहसिल कार्यालयाच्या समोर दि.5 जुलै रोजी मोदी सरकार विरूध्द प्रचंड घोषणेबाजी देत मोदी सरकारच्या विरोधात धरणे आंदोलन करून तीव्र निषेध करण्यात आला आहे. युपीए सरकारच्या काळामध्ये इंधनाच्या किंमती कमी होत्या आता त्या किंमती दुप्पटीने वाढल्या आहेत.
पेट्रोल-डिझेल, घरगुती गॅसच्या किंमती कमी कराव्यात
केंद्र सरकारने गॅस, पेट्रोल-डिझेल या इंधनाच्या वस्तूमध्ये प्रचंड वाढ केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांत या भाव वाढीबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष ना.जयंत पाटील यांच्या सुचनेवरून व शेतकरी नेते माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले.
यावेळी मनोगत व्यक्त करतांना रामचंद्र येइलवाड म्हणाले की, मागील युपीए सरकारच्या काळात गॅस प्रति सिलेंडर 400 रूपये होता आज त्याचे भाव दुप्पट आहे. तसेच पेट्रोल 70 रूपये होते ते आता 107 रूपये प्रति लिटर झाले. डिझेल 50 रू.प्रति लिटर होते ते 87 रू.प्रति लिटर झाले. तसेच इतर खाद्य पदार्थाचे तेल, दाळ व कडधान्याचे भाव प्रचंड वाढले आहे. सर्वसामान्य जनता महागाईच्या चटक्याने होरपळून निघत आहे. केंद्र सरकारने ही भाववाढ त्वरीत मागे घ्यावी, यावर नियंत्रण आणावे असे म्हणत बाबुराव केंद्रे,शिवदास पाटील धर्मापुरीकर,राजकुमार केकाटे,दत्ता कारामुंगे यांनी केंद्र सरकारच्या धोरणाचा तीव्र निषेध केला.
इंधनाच्या किंमती कमी कराव्यात या संदर्भातील निवेदन तहसिलदार मार्फत प्रधानमंत्री मोदी यांना पाठविण्यात आले. या आंदोलनात कार्यकर्त्यांनी व पदाधिकार्यांनी मोदी सरकार विरूध्द प्रचंड घोषणेबाजी दिली व तीव्र भावना मनोगत व्यक्त केले. यावेळी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते रामचंद्र येइलवाड,डाँ सुनिल पाटील धोंडगे, शिवदास पाटील धर्मापुरीकर,बाबुराव केंद्रे,मनोहर पाटील भोसीकर,अँड.विजय धोंडगे, राजकुमार केकाटे, दत्ता कारामुंगे,शफ्फिउल्ला बेग, न्यानोबा घुगे, सर्जेराव मोरे, सुभाष राहेरकर,सुभाष वाकोरे,सुरेश शिरसे, शरद भागानगरे, संतोष कागणे, भरत चिखलीकर,जयराम कांबळे,गोपीनाथ केन्दे,परसराम कदम,संभाजी मोरे,न्यानोबा तिडके,शिवराज कागणे,बादल,न्यानोबा बुरकुल,स्वप्निल राठोड, यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने यावेळी उपस्थिती होती.सुत्रसंचलन शहराध्यक्ष राजकुमार केकाटे यांनी केले तर आभार ता.अध्यक्ष शिवदास पाटील धर्मापुरीकर यांनी मानले.