नांदेड ; प्रतिनिधी
आज दि.१२ जुलै रोजी शिक्षक परिषदेच्या वतीने मा. जि.प. अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर , मा. मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. वर्षाताई ठाकुर , शिक्षण सभापती मा. संजयजी बेळगे ,समाजकल्याण सभापती मा.रामराव नाईक , उपमुख्य कार्यकारी अधिकारी मा.सुधीर ठोंबरे, माध्य. शिक्षणाधीकारी मा. माधव सलगर ,शिक्षणाधिकारी मा. प्रशांत दिग्रसकर ,उपशिक्षणाधिकारी मा.बंडु आमदुरकर , दिलीप बनसोडे यांचा राज्यकार्याध्यक्ष मधुकर उन्हाळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाच्या वतीने यथोचित सत्कार करून आभार मानले.
मा. पदाधीकारी व अधिकारी वर्गाने मागील महिन्यात संघटनेच्या मागणीची दखल घेऊन १ ) शिक्षण विस्तार अधिकारी पदोन्नती, ( २ ) कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी पदोन्नती, (३)अराजपत्रित मुख्याध्यापक, (४) व पदोन्नत मुख्याध्यापक पदोन्नती, या सर्व पदोन्नतीचा प्रश्न निकाली काढून ग्रामीण भागातील शाळांना योग्य न्याय दिला, त्यामुळे शाळेच्या गुणवत्तेत निश्चीतपणे सुधारणा होणारच, याप्रसंगी शिक्षक परिषदेच्या वतीने सत्कार करताना शिष्टमंडळात, राज्य कार्याध्यक्ष मधुकर उन्हाळे, विभागीय अध्यक्ष संजय कोठाळे, जिल्हाध्यक्ष डी.एम. पांडागळे, जिल्हा संपर्क प्रमुख व्यंकट गंदपवाड, जिल्हा उपाध्यक्ष बी.डी. जाधव आदी पदाधीकारी उपस्थीत होते..