कंधार ; प्रतिनिधी
दोन दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे कंधार शहरासह तालुक्यातील शेतकऱ्यांचे शेतीचे,घरांचे अतोनात नुकसान झाले असल्याने तात्काळ पंचनामे करुन शेतकर्यांना मावेजा देण्याची मागणी दा.१३ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने तहसिलदार यांना निवेदना व्दारे केली आहे.
मागील अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने अकरा जुलै रोजी दुपार पासुन झालेल्या पावसाने उग्र रूप धारण करुन मेघगर्जनेसह व विजांचे कडकडासह मुसळधार पाऊस पडण्यास सुरुवात झाली सायंकाळी पर्यंत अखंडीत धुवाधार पाऊस पडत असल्याने लहान -मोठे ओढे व नाले तुडूंब भरुन वेगाने वाहत असल्यामुळे काठावरील सुपीक जमीनीचा कांही भाग खचुन गेल्यामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
कंधार शहरासह तालुक्यात पावसाने थयमान घातल्याने सोयाबीन,कापुस,ज्वारी,मुग,उडीद,या पिकाची नासाडी झाली असून घरांची पडझड झाल्यामुळे कित्येक जनांचे संसार उघड्यावर आलेले आहेत अतिवृष्टी च्या पावसाने जनावरे,शेळ्या हि वाहुन गेले आहेत.शेती,घरांची,जनावरांची तात्काळ पंचनामे करुन शेतकर्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे ता.अध्यक्ष शिवदास पाटील धर्मापुरीकर,विधानसभा अध्यक्ष बाबुराव केंद्रे,शहराध्यक्ष राजकुमार केकाटे,विधानसभा उपाध्याय दत्ताभाऊ कारामुंगे,मनोहर कारामुंगे,दिगंबर पाटील वडजे, कार्यध्यक्ष संतोष कागणे,सुधाकर पाटील मोरे,ओबीसी ता.अध्यक्ष न्यानोबा घुगे,स्वप्निल राठोड यांनी तहसिलदार यांना केली आहे.