बारुळ ; (शंकर जाधव )
कंधार तालुक्यातील बारूळ महाराष्ट्र ग्रामीण बँक येथे कर्मचाऱ्या अभावी शेतकर्यांची हेळसांड होत आहे बारूळ महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेत वीस ते पंचवीस गावचा जनसंपर्क असल्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी व पैसे देवाण-घेवाण करण्यासाठी तासन्तास ताटकळत उभे राहावे लागत आहे त्यासाठी शेतकऱ्यांची व परिसरातील जनतेची हेळसांड होऊ नये यासाठी शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन बारूळ येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत तात्काळ दोन कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी या मागणीचे निवेदन महाराष्ट्र ग्रामीण बँक विभागीय व्यवस्थापक शशिकांत बारगोडे यांची प्रत्यक्षात भेट घेऊन मराठा महासंग्राम संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष विक्रम पाटील बामणीकर यांनी एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
सध्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेत पिक विमा भरण्यासाठी तसेच संख्य मजूर शेतकरी विधवा अपंग वृद्ध मंडळी यांची खाते आहेत कर्मचारी कमी असल्यामुळे शेतकऱ्यांची पीक कर्जाची समस्या पण गंभीर होऊन बसली आहे सध्या स्थिती कामाचे दिवस असल्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर कामे होत नसल्यामुळे तासन्तास ताटकळत बँकेच्या परिसरात लाइन लावून उभा टाकण्याची वेळ येत असल्यामुळे शेतकऱ्यांना व अपंग निराधार वयोवृद्ध नागरिकांना पैसे काढण्यासाठी व भरण्यासाठी अख्खा दिवस जात असल्यामुळे जनतेची समस्या तत्काळ लक्षात घेऊन बारूळ येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत तात्काळ दोन कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी जेणेकरून शेतकऱ्यांना व वृद्धांना याचा त्रास होणार नाही व वेळेत काम होतील असे विक्रम पाटील बामणीकर यांनी विभागीय व्यवस्थापक शशिकांत बारगोडे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी विभागीय व्यवस्थापक शशिकांत बोराडे यांनी प्रत्यक्षात पाहणी करून जेवढे लवकरात लवकर होईल तेवढे बारूळ येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत कर्मचारी देण्याचे आश्वासन त्यांनी विक्रम पाटील बामणीकर यांना दिले आहे असे विक्रम पाटील बामणीकर यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे व दिलेल्या निवेदनावर त्यांची स्वाक्षरी आहे दिलेल्या निवेदनाच्या प्रती जिल्हा अधिकारी व कंधार लोहा चे आमदार यांना दिलेले आहेत.