कंधार ; प्रतिनिधी
लोहा, कंधार विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार शामसुंदर शिंदे यांच्या सुविद्य पत्नी तथा लोकप्रिय सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शामसुंदर शिंदे यांचा वाढदिवस 20 जुलै रोजी विविध सामाजिक उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा होणार असून आशाताई शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त लोहा, कंधार मतदारसंघात “वृक्षारोपण सप्ताहाचे” आयोजन मतदार संघात करण्यात आले आहे.
रविवारी दिनांक 18 जुलै रोजी गुंडेगाव येथे जय भारत माता सेवा समिती संचलित भोळेश्वर मल्लिनाथ मंदिरात मल्लिनाथ देवस्थान गुंडेगाव यांच्या सौजन्याने व सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाने रविवारी एकाच दिवशी आमदार श्यामसुंदर शिंदे, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर ,जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्या प्रमुख उपस्थित दहा हजार वृक्षांची लागवड करण्यात आली.
यावेळी या कार्यक्रमास लोहा, कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार शामसुंदर शिंदे, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर ,जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, सिडको ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड, जिल्हा नियोजन समिती सदस्य रावसाहेब पाटील शिंदे, कंधार कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती ज्ञानेश्वर पाटील चोंडे, पंचायत समिती सदस्य सत्यनारायण मानस पूरे, खरेदी विक्री संघ लोहाचे सभापती प्रतिनिधी संदीप पाटील उमरेकर, उपसभापती श्याम अण्णा पवार प्रमुख उपस्थित होते, यावेळी उपस्थित प्रमुख मान्यवरांचा सत्कार जय भारत सेवा समिती व भोळेश्वर मल्लिनाथ देवस्थानच्या वतीने सरपंच दासराव हंबर्डे यांनी केला .यावेळी सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शामसुंदर शिंदे ,आमदार शामसुंदर शिंदे, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर ,पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्या हस्ते वृक्षाचे रोपण करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावरून बोलताना सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे म्हणाल्या की प्रत्येक नागरिकांनी निसर्गावर जिवापाड प्रेम केले पाहिजे, निसर्गामध्ये देव बघितला पाहिजे, झाडे हे मानवी जीवनासाठीची अमूल्य देणगी असून कोरोना च्या महाभयंकर संकटात शेकडो नागरिकांना ऑक्सिजन अभावी प्राणास मुकावे लागले असून दैनंदिन जीवन जगत असताना मानवाला शुद्ध ऑक्सिजनची नितांत गरज आहे, झाडे हे मानवाला निरोगी दीर्घायुष्य देण्यासाठी मोलाचे काम विनामूल्य करत असतात ,यासाठी प्रत्येक नागरिकांनी स्वतःच्या आरोग्यासाठी व आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी प्रत्येकाने एक झाड लावून त्याची योग्य पद्धतीने जोपासना करून पर्यावरणाचा समतोल राखण्याची काळाची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन यावेळी सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शामसुंदर शिंदे यांनी केले .
या वेळी पुंडलिकराव पाटील बोरगावकर,सरपंच बाळासाहेब गर्जे,सिद्धू वडजे,सचिन क्षिरसागर, नागेश खांबेगावकर,राहुल पाटील, शिवराज शिंदे, माधव घोरबांड,माधव मोरे,अनिकेत जोमेगावकर ,आनंद देशमुख,श्याम सावळे,हणमंत जाधव, विश्वंभर पवार, सुधाकर सातपुते ,सतीश देवक्तते,कंधारवाडीचे उपसरपंच गिरीश डिगोळे,रणजितसिंह कामठेकर,धनज चे सरपंच पंजाब माळेगावे, कापसी उपसरपंच गणेश वडवळे,सह पत्रकार बांधव कार्यकर्ते ,पदाधिकारी, गावकरी मोठया संख्येने सामाजिक अंतराचे पालन करत उपस्थित होते.